शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Satara: क्रिकेट खेळायला जातो म्हणून मुलगा घरातून गेला, दिवसभर शोधूनही नाही सापडला; आई चिंतेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 16:17 IST

काैटुंबीक परिस्थिती आणि शिक्षण घेण्याची इच्छा होत नसल्याने मुले घर सोडत असल्याचे पोलिसांचे म्हणणे

सातारा : मुलांसोबत क्रिकेट खेळण्यास जातो, असे सांगून एका १७ वर्षाच्या तरुणाने घर सोडलं असून, त्याची आई चिंतेत आहे. आपल्या मुलाला शोधून आणावे, अशी मागणी करत आईने शाहूपुरी पोलिस ठाण्यात मुलगा गायब झाल्याची तक्रार नोंदवली आहे.युवराज भिमा साळुंखे (वय १७, रा. मंगळवार पेठ, सातारा) असे घरातून निघून गेलेल्या तरुणाचे नाव आहे. युवराज हा दहावी उत्तीर्ण झाला आहे. मात्र, अद्याप त्याने अकरावीला ॲडमिशन घेतले नाही. त्याला क्रिकेट खेळण्याची प्रचंड आवड आहे. रविवारी सकाळी साडेअकरा वाजता तो मुलांसोबत क्रिकेट खेळायला जातो, असे सांगून घरातून निघून गेला. मात्र, संध्याकाळी तो घरी परत न आल्याने त्याच्या आईला काळजी वाटली. आई घरकामात असल्यामुळे मुलगा क्रिकेट खेळत असेल, असे वाटले. परंतु अंधार पडल्यानंतर आईच्या चिंतेत अधिकच भर पडली. माची पेठेतील काळ्या दगडाजवळील मैदानावर मुले नेहमी क्रिकेट खेळतात. त्या ठिकाणी आई गेली. युवराज आला होता का, अशी त्याच्या मित्रांकडे आईने चाैकशी केली. त्यावेळी आपला मुलगा काळ्या दगडाजवळील मैदानात आला नसल्याचे आईला समजले. शाळेतील कोणत्या मित्राकडे आपला मुलगा गेला आहे का, याचीही आईने माहिती घेतली.

घरात कसलाही वाद नाही. असे असताना तो घरातून का निघून गेला, या चिंतेने आईला ग्रासले. दुसऱ्या दिवशी दिवसभर पै पाहुणे, त्याच्या मित्रांकडे आईने व त्याच्या मोठ्या भावाने शोध घेतला. परंतु तो सापडला नाही. सरतेशेवटी त्याच्या आईने शाहूपुरी पोलिस ठाण्यात धाव घेऊन आपला मुलगा गायब झाल्याची तक्रार नोंदवली. महिला पोलिस हवालदार कांबळे या अधिक तपास करीत आहेत.

शिक्षण घेण्याची इच्छा होत नाहीअलीकडे अवघ्या १४ ते १७ वर्षांखालील अल्पवयीन मुले घर सोडत असल्याने पालक हतबल होत आहेत. घरात काहीही वाद नसताना मुले घर सोडून जात आहेत. काैटुंबीक परिस्थिती आणि शिक्षण घेण्याची इच्छा होत नसल्याने मुले घर सोडत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.