शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
3
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
4
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
5
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
6
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
7
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
8
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
9
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
10
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
11
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
12
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
13
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
14
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
15
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
16
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
17
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
18
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
19
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
20
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले

Crime News: खळबळजनक! पोटच्या मुलानेच केला वृध्द पित्याचा खून, माण तालुक्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2022 14:12 IST

दहिवडी : ज्या मुलाला आयुष्यभर संभाळले त्या पोटच्या मुलाने स्वतःच्याच वृध्द पित्याचा कुराडीने घाव घालून खून केला. या घटनेने ...

दहिवडी : ज्या मुलाला आयुष्यभर संभाळले त्या पोटच्या मुलाने स्वतःच्याच वृध्द पित्याचा कुराडीने घाव घालून खून केला. या घटनेने माण तालुक्यात खळबळ माजली आहे. पांडुरंग बाबुराव सस्ते (वय ७० ) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.कासारवाडी (ता.माण ) येथील आरोपी मुलगा नटराज पांडुरंग सस्ते हा आपले वृध्द वडील पांडुरंग बाबुराव सस्ते यांच्यावर मला मटण का खाऊ घालत नाही म्हणून चिडला होता.  शुक्रवारी सायंकाळी ४ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास कासारवाडी येथील स्वतःच्या मालकीच्या भंडारदरा मळवी या शिवारात पाठीमागून डोक्यावर व मानगुटीवर मुलगा नटराज यांने वडील पांडुरंग सस्ते यांच्यावर कुराडीने घाव घालून गंभीर जखमी केले. त्यानंतर ते जागीच रक्ताच्या थारोळ्यात मृत होऊन पडले.ही घटना गावभर पसरताच सगळीकडे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर चतुराबाई पांडुरंग सस्ते (वय ६० ) यांनी दहिवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. दहिवडी पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक डी. डी. तुपे यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी नटराज सस्ते यास पोलिसांनी अटक केली आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारी