शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : पुत्र व्हावा ऐसा गुंडा... पळशीतील पुत्राने उभारले आई-वडिलांचे मंदिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 14:05 IST

पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा या उक्तीस सार्थ असे कार्य खटाव तालुक्यातील पळशी या गावात राहणाऱ्या सोपान ऊर्फ बाळू गणपत जाधव यांनी केले आहे. देवदेवतांची मंदिरे तर अनेकजण बांधतात; परंतु सोपान जाधव यांनी आई-वडिलांच्या स्मरणार्थ त्यांचेच मंदिर बांधले असून, त्यामध्ये दोघांच्या मूर्तीची स्थापनाही केली आहे.

ठळक मुद्देपुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा उक्तीस सार्थआई-वडिलांच्या स्मरणार्थ मंदिर उभारण्याचा निर्णय

औंध : पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा या उक्तीस सार्थ असे कार्य खटाव तालुक्यातील पळशी या गावात राहणाऱ्या सोपान ऊर्फ बाळू गणपत जाधव यांनी केले आहे. देवदेवतांची मंदिरे तर अनेकजण बांधतात; परंतु सोपान जाधव यांनी आई-वडिलांच्या स्मरणार्थ त्यांचेच मंदिर बांधले असून, त्यामध्ये दोघांच्या मूर्तीची स्थापनाही केली आहे.खटाव तालुक्यातील पळशी हे गाव वडूज-कऱ्हाड रस्त्यावर असून, गावापासून काही अंतरावर जाधव वस्ती आहे. सोपान ऊर्फ बाळू गणपत जाधव यांच्या आई बकुळाबाई जाधव यांचे फेब्रुवारी २०१२ रोजी निधन झाले. तर महिन्यानंतर वडील गणपत जाधव यांनीही जगाचा निरोप घेतला. दोघांच्या निधनाने जाधव कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. या दाम्पत्याला चार मुले व एक मुलगी असा परिवार आहे. बाळू जाधव हे भावंडांमध्ये सर्वात लहान.काबाडकष्ट करून आपल्याला लहानाचे मोठे करणाऱ्या व कुटुंबासाठी आयुष्यभर झटणाऱ्या आई-वडिलांची आठवण कायम तेवत राहावी यासाठी काहीतरी करावे, अशी कल्पना बाळू जाधव यांच्या मनात आली. त्यानुसार त्यांनी आई-वडिलांच्या स्मरणार्थ त्यांचेच मंदिर उभारण्याचा निर्णय घेतला.त्यानुसार मंदिराच्या प्रत्यक्ष कामास त्यांनी २०१२ रोजी सुरुवात केली व दोघांच्या वर्षश्राद्धावेळी मंदिर पूर्ण केले. आजपर्यंत त्यांनी मंदिरास तब्बल दहा लाख रुपये एवढा खर्च केला आहे. किरकोळ काम वगळता मंदिर पूर्णत्वास आले आहे. जवळपास दहा गुंठे क्षेत्रात हे मंदिर उभारण्यात आले आहे.

मंदिराच्या परिसरात फुलझाडे फुलविण्याचा बाळू जाधव यांचा मानस आहे. अनेकजण घरातून बाहेर पडताना श्रद्धेपोटी देवदेवतांचे दर्शन घेतात. मात्र, बाळू जाधव मंदिरात स्थापन केलेल्या आई-वडिलांच्या चरणी नतमस्तक होऊन दिवसाची सुरुवात करतात. बाळू जाधव यांनी मंदिराची उभारणी करून पुत्रप्रेमाची अनोखी महती सर्वांसमोर आणली आहे. 

आई-वडिलांनी आमच्यासाठी खूप काही केलं आहे. त्यांची आठवण कायम स्मरणात राहावी, यासाठी त्यांचे मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला. जीवात-जीव असेपर्यंत या मंदिराची देखभाल करणार आहे. तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजनही करणार आहे.- सोपान ऊर्फ बाळू जाधव

टॅग्स :Satara areaसातारा परिसरTempleमंदिर