पुत्र भीम-माता कुंती उत्सवाची सांगता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:44 IST2021-09-23T04:44:11+5:302021-09-23T04:44:11+5:30

उंब्रज: ‘भीमसेन महाराज की जय’ ‘कुंती माता की जय’ हा जयघोष करत बुधवारी युवकांनी भीमाची मूर्ती विराजमान झालेला भीम ...

Son Bhim-Mata Kunti concludes the festival! | पुत्र भीम-माता कुंती उत्सवाची सांगता!

पुत्र भीम-माता कुंती उत्सवाची सांगता!

उंब्रज: ‘भीमसेन महाराज की जय’ ‘कुंती माता की जय’ हा जयघोष करत बुधवारी युवकांनी भीमाची मूर्ती विराजमान झालेला भीम गाडा ओढत कृष्णानदीच्या काठी नेला. तेथे विधिवत पूजन करून पुत्र भीम व माता कुंती यांच्या मूर्तीचे कृष्णानदीत विसर्जन केले. महिनाभर चालणाऱ्या भीम-कुंती उत्सवाची सांगता झाली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी येथील भीम-कुंती उत्सवाला साध्या पद्धतीने सुरुवात झाली होती. या उत्सवाला शेकडो वर्षांची ऐतिहासिक परंपरा आहे. परंपरेनुसार भाद्रपद पाैर्णिमेनंतर पुत्र भीम व माता कुंती यांच्या मूर्तीच्या विसर्जनाची तयारी सुरू होती. सोमवार, दि. २० सप्टेंबर रोजी रात्री भीम मंडपात खिरीच्या प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर मंगळवार, दि. २१ रोजी भीमाची मूर्ती दिल्ली दरवाजात आणण्यात आली. त्यानंतर भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. बुधवार, दि. २२ रोजी सकाळी ९.३० वाजण्याच्यासुमारास पुत्र भीम व कुंती माता यांच्या मूर्तींचे दिल्ली दरवाजात विधिवत पूजन करण्यात आले. यानंतर भीम गाड्यावर विराजमान असलेल्या भीमाची मूर्ती ओढण्यासाठी भीमसेन मंडळाच्या कार्यकर्त्यांनी तसेच तरुणांनी सहभाग घेतला. यावेळी जाणकार मंडळी मार्गदर्शन करताना दिसत होती.

यावेळी ‘भीमसेन महाराज की जय’ ‘कुंती माता की जय’ या जयघोषात भीम गाडा ओढत कृष्णा नदीपात्राकडे नेण्यात आला. भीम-कुंती यांची मूर्ती विसर्जनासाठी नेत असताना जागोजागी महिला आरती ओवाळून दर्शन घेताना दिसून येत होत्या. भीम गाडा नदीकाठी विसावल्यानंतर विधिवत पूजन, आरती करून पुत्र भीम व माता कुंती यांच्या मूर्तींचे विसर्जन कृष्णा नदी पात्रात करण्यात आले.

फोटो आहे.

२२उंब्रज

उंब्रज येथे ‘भीमसेन महाराज की जय’ ‘कुंती माता की जय’चा जयघोष करत बुधवारी युवकांनी भीम गाडा ओढत कृष्णानदीच्या काठी नेला.

Web Title: Son Bhim-Mata Kunti concludes the festival!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.