शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

घनकचरा, सांडपाणी व्यवस्थापनाची चळवळ; साताऱ्यातील २१ गावांना साडे पाच कोटी 

By नितीन काळेल | Updated: October 14, 2023 19:11 IST

कऱ्हाडमधील सर्वाधिक ९ ग्रामपंचायतींचा समावेश

सातारा : स्वच्छ आणि सुंदर तसेच आरोग्यपूर्ण गावासाठी घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन महत्वाचे आहे. यासाठी जिल्ह्यात सात तालुक्यांतील २१ ग्रामपंचायतींना ५ कोटी ५६ लाख रुपयांचा कार्यारंभ आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिला आहे. यातील सर्वाधिक ९ गावे ही कऱ्हाड तालुक्यातील आहेत. या कार्यारंभ आदेशाने लवकर कामे मार्गी लागून पूर्णत्वास जाणार आहेत.घनकचरा आणि सांडपाण्याची समस्या सर्वत्रच आहे. याबाबत शासनस्तरावरुन विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यामुळे याबाबत गावागावांत जनजागृती होत चालली आहे. सातारा जिल्ह्यात तर घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन खूप चांगल्या पध्दतीने सुरू आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून यासाठी प्रयत्नही करण्यात येतात. आता सात तालुक्यातील २१ गावांना व्यवस्थापनासाठी साडे पाच कोटी निधीचा कार्यारंभ आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांनी दिला आहे.जिल्ह्यातील लोकसंख्या आणि विस्ताराने मोठ्या आसलेल्या कऱ्हाड तालुक्यातील काळगाव, उंडाळे, दुशेरे, रेठरे खुर्द, वहागाव, कोडोली, रेठरे बुद्रुक, विरवडे, इंदोली या गावांना कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे. तसेच फलटण तालुक्यातील विडणी, खटाव तालुक्यातील मायणी, निमसोड व सिद्धेश्वर कुरोली तर माण तालुक्यातील पळशी, गोंदवले बुद्रुक. सातारा तालुक्यातील अतित, खोजेवाडी, जकातवाडी, त्याचबरोबर पाटण तालुक्यातील ढोरोशी, विहे आणि जावळी तालुक्यातील कुडाळ या ग्रामपंचायतींना कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत.

या निधीतून गावांमध्ये घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाची कामे केली जाणार आहेत. घनकचऱ्यासाठी नॅडेफ व गांडुळ खत प्रकल्पाद्वारे खत निर्मितीही केली जाणार आहे. तर सांडपाणी व्यवस्थापनासाठी शोषखड्डे, लिच पिट, रिड बेड, रुट झोन प्रक्रिया केली जाणार आहे. तर स्वच्छ सुंदर व आरोग्यपूर्ण गावांसाठी घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन गरजेचे आहे. आता ग्रामपंचायतींना ही कामे दर्जेदार होण्यासाठी लक्ष ठेवावे लागणार आहे. ओला व सुका कचरा कुटुंबपातळीवरच वर्गीकरण करावे लागेल. त्यातील ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती करण्यात होईल. सांडपाणी व्यवस्थापनाच्या कामांमुळे भूगर्भातील पाणीपातळी वाढण्यास मदत होणार आहे. तसेच पाणीस्त्रोतांचे प्रदूषणही थांबले जाणार आहे.

जिल्ह्यातील १७३८ पैकी ९४४ गावांची घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाची कामे पूर्ण झालेली आहेत. सध्या काही ग्रामपंचायतींची कामे सुरु आहेत. त्यांनी घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थानाची सर्व कामे आक्टोंबर महिनाअखेरपर्यंत पूर्ण करावीत. तसेच ग्रामपंचायतींनीही सर्व कामे चांगला दर्जा आणि गुणवत्तापूर्ण करण्याची आवश्यकता आहे. - ज्ञानेश्वर खिलारी, मुख्य कार्यकारी अधिकारी

टॅग्स :Satara areaसातारा परिसर