शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Satara: यात्रेसाठी गावी आलेल्या जवानाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 13:59 IST

दहिवडी (जि.सातारा) : दानवलेवाडी (ता.माण) येथील जवान प्रशांत दिलीप कदम (वय ३५) यांचा शुक्रवारी विजेचा धक्का बसल्याने शुक्रवारी मृत्यू ...

दहिवडी (जि.सातारा) : दानवलेवाडी (ता.माण) येथील जवान प्रशांत दिलीप कदम (वय ३५) यांचा शुक्रवारी विजेचा धक्का बसल्याने शुक्रवारी मृत्यू झाला. प्रशांत कदम हे भारतीय सैन्य दलातील १९ मराठा लाइट इन्फंट्री या रेजिमेंटमध्ये आसाम येथे कार्यरत होते. नुकतीच त्यांची हवालदार पदी पदोन्नती झाली होती. दानवलेवाडी येथील श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेनिमित्त दहा दिवसांपूर्वी ते सुटीवर आले होते. यात्रेचा मुख्य दिवस शुक्रवारी होता. गावकऱ्यांसह प्रशांत यांचीसुद्धा लगबग सुरू होती. यात्रेनिमित्त घरात पिण्याचे पाणी भरण्यासाठी सकाळी दहाच्या सुमारास ते घरासमोरील नळपाणी पुरवठा योजनेच्या पाइपला विद्युत पंप जोडत होते. त्याचवेळी अचानक पाण्यामध्ये विद्युत प्रवाह उतरल्याने प्रशांत यांना विजेचा जोरदार धक्का लागून ते जागीच कोसळले. त्यांच्या पत्नीने ही घटना पाहिल्यानंतर आरडाओरडा करून नातेवाइकांना बोलावले. तत्काळ त्यांना दहिवडी येथील शासकीय रुग्णालयामध्ये नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच प्रशांत यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. यात्रेदिवशीच झालेल्या या घटनेने गावात शोककळा पसरली आहे.मृत जवान प्रशांत यांच्यावर रात्री उशिरा शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रशांत कदम यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी व मुलगा असा परिवार आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर