‘शहापूर’साठी सोलरची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:46 IST2021-09-04T04:46:55+5:302021-09-04T04:46:55+5:30

सातारा : शहापूर पाणीपुरवठा योजनेसाठी महिन्याला २५ लाख रुपये वीजबिल येत आहे. इतकी मोठी रक्कम खर्च करणे योग्य वाटत ...

Solar help for ‘Shahapur’ | ‘शहापूर’साठी सोलरची मदत

‘शहापूर’साठी सोलरची मदत

सातारा : शहापूर पाणीपुरवठा योजनेसाठी महिन्याला २५ लाख रुपये वीजबिल येत आहे. इतकी मोठी रक्कम खर्च करणे योग्य वाटत नसल्याने या योजनेसाठी सोलरची मदत घ्यावी, अशी मागणी केली आहे. शासनाकडून निधी उपलब्ध झाल्यास वीज बिलापोटी भरावी लागणारी रक्कम वाचण्यास मदत होणार आहे, अशी माहिती पाणीपुरवठा सभापती सीता हादगे यांनी दिली.

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, गेल्या दोन वर्षांत सातारच्या विकासकामांवर कोरोनाचा मोठा परिणाम झाला असला, तरी या कालावधीत सातारकरांच्या समस्या काय आहेत, मुबलक व स्वच्छ पाणी पुरवठा करण्याच्या दृष्टीने कोणत्या उपाययोजना करायला हव्यात, याचा सविस्तर अभ्यास करून खासदार उदयनराजे भोसले, नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, पक्षप्रतोद ॲड. डी. जी. बनकर यांच्याकडे नगरपालिकेच्या माध्यमातून विकास कामांसाठी निधीची मागणी करण्यात आली होती.

सातारा शहर परिसरातील पेठ-करंजेलगतच्या बसप्पा पेठ, शिंदे मळा, भोसलेनगर, शेलारवस्ती या भागाला सातारा तालुका पोलीस स्टेशनलगत असणाऱ्या पाण्याच्या टाकीतून पाणीपुरवठा केला जातो. या परिसरात ८ ते १० हजारांवर लोकवस्ती आहे. १० लक्ष लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बांधण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून काही निधी मंजूर झाला आहे. टाकी बांधण्यासाठी जागा उपलब्ध झाली नसल्याने पुढील कार्यवाही करता आली नाही. मात्र सद्य परिस्थितीत जागा उपलब्ध झाली असल्याने या कामासाठी ९९ लाख ६३ हजार ०८९ कृपया खर्चाच्या सुधारित अंदाजपत्रकास सर्वसाधारण सभेत एकमताने मंजुरी मिळाली आहे.

(चौकट)

या कामांना मंजुरी

पालिकेच्या सभेमध्ये सांबरवाडी फिल्टरेशन प्लांटमध्ये फिल्टर बेड व इतर अनुषंगिक कामासाठी ७५ लाख, यूआयडीएसएसएमटी योजनेमधील डोंगर मार्गातील अपूर्ण राहिलेल्या पावर हाऊस ते माची पेठअखेर नवीन गुरुत्व नलिका, माची पेठ-नागझरी टाक्यांची वितरण नलिका या कामासाठी १ कोटी ३७ लाख, शहापूर योजनेअंतर्गत जकातवाडी फिल्टरेशन प्लांटमधील फिल्टर बेड व इतर अनुषंगिक कामांना मंजुरी मिळाली आहे.

Web Title: Solar help for ‘Shahapur’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.