शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

सोसायटीची निवडणूक बिनविरोध

By admin | Updated: January 18, 2016 22:16 IST

विंचुरी दळवी : नूतन संचालकांचा सत्कार

 सिन्नर : तालुक्यातील विंचुरी दळवी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी एस. बी. कासार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवडणुकीत संचालक मंडळाच्या १३ जागांसाठी १७ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. तथापि, माघारीच्या निर्धारीत वेळेत सर्वसाधारण गटातून दत्तात्रय पोपट शेळके, इतर मागास प्रवर्गातून संपत होनाजी चंद्रे व भाऊराव रामकृष्ण शेळके यांनी, तर भटक्या विमुक्त जाती गटातून रामनाथ कारभारी सानप यांनी माघार घेतल्याने निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला. संचालक मंडळाच्या तेरा जागांसाठी तेराच अर्ज शिल्लक राहिल्याने सर्वसाधारण गटाच्या सात जागांवर विश्राम बाळाजी शेळके, पांडुरंग निवृत्ती दळवी, कारभारी केरू जाधव, लक्ष्मण आवडाजी भोर, भाऊराव रामकृष्ण शेळके, बाळू कृष्णा भोर, संपत होनाजी चंद्रे, रमेश सीताराम दळवी यांची, तर इतर मागास वर्गाच्या एका जागेवर सुरेश फकिरा दळवी, महिला राखीव गटाच्या दोन जागांवर लता निवृत्ती भांगरे व अलका मोहन दळवी, अनुसूचित जमातीच्या जागेवर उत्तम एकनाथ बर्वे, तर भटक्या जाती जमातीच्या एकाजागेवर भगवान पांडुरंग सांगळे यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी कासार यांनी जाहीर केले. सचिव के. डी. हरळे यांनी निवडणूक कामात सहकार्य केले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुकाध्यक्ष शरद शिंदे, सरपंच भाऊराव पवार, भाऊसाहेब दळवी, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष जयराम दळवी यांच्या हस्ते नूतन संचालकांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मनसेचे तालुका उपाध्यक्ष गोपाळा गायकर, कैलास दातीर, मोतीराम जाधव, तुकाराम शेळके, पांडुरंग दळवी, संजय काळे, संतोष लोंढे, कचरू शेळके, बळवंच बर्वे, रमाकांत बर्वे, रमेश झाडे, बाळासाहेब मोरे, दामोधर शेळके, पांडुरंग डावरे आदिंसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)