शेंद्रेकर शिक्षकांची सामाजिक बांधिलकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:38 IST2021-05-10T04:38:47+5:302021-05-10T04:38:47+5:30
शेंद्रे : शेंद्रे (ता. सातारा) येथील शिक्षकांनी एकत्र येत सामाजिक बांधिलकीची प्रचीती दिली. या शिक्षकांनी गावातील गरीब, गरजू व्यक्तींना ...

शेंद्रेकर शिक्षकांची सामाजिक बांधिलकी
शेंद्रे :
शेंद्रे (ता. सातारा) येथील शिक्षकांनी एकत्र येत सामाजिक बांधिलकीची प्रचीती दिली. या शिक्षकांनी गावातील गरीब, गरजू व्यक्तींना जीवनाश्यक वस्तूंचे वाटप करत संवेदनशीलतेचे दर्शन घडविले.
शेंद्रे गावाला सध्या कोरोनाजन्य परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. खबरदारीची उपाययोजना म्हणून गेले कित्येक दिवसांपासून येथील बाजारपेठ, सर्व व्यवहार ठप्प आहेत. त्यामुळे लोकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. विशेषतः हलाखीची परिस्थिती, हातावर पोट असणाऱ्या लोकांच्या रोजच्या जेवणखाण्याचा प्रश्न उभा राहिला आहे.
या पार्श्वभूमीवर गावातील शिक्षकांनी एकत्र येत संबंधितांना दिलासा देण्याचे काम केले आहे. त्यात चंद्रकांत जाधव, बजरंग कदम, प्रकाश जाधव, बाळासाहेब माने, अनिल शिंदे, अनिल पोतेकर, संतोष सूर्यवंशी, संपत पोतेकर, शामराव गायकवाड, रवींद्र वाघमारे या शिक्षकांनी पुढाकार घेतला आहे. या ग्रुपच्या वतीने हरभराडाळ, तूरडाळ, मूगडाळ, गूळ, साखर, चहापावडर, तांदूळ, साबण, तेल आदी जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप गरीब, गरजू व्यक्तींना करण्यात आले आहे.
फोटो :
शेंद्रे, ता. सातारा येथे गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करताना शिक्षक.