आधुनिक फॉगिंग मशीनद्वारे धूर फवारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:41 IST2021-08-27T04:41:46+5:302021-08-27T04:41:46+5:30

पालिकेचे आरोग्य सभापती विजय वाटेगावकर यांच्या उपस्थितीत मशीनची चाचणी झाली. यापूर्वीच्या मशीनपेक्षा नवीन मशीन प्रभावी असल्याचे विजय वाटेगावकर यांनी ...

Smoke spraying by modern fogging machine | आधुनिक फॉगिंग मशीनद्वारे धूर फवारणी

आधुनिक फॉगिंग मशीनद्वारे धूर फवारणी

पालिकेचे आरोग्य सभापती विजय वाटेगावकर यांच्या उपस्थितीत मशीनची चाचणी झाली. यापूर्वीच्या मशीनपेक्षा नवीन मशीन प्रभावी असल्याचे विजय वाटेगावकर यांनी सांगितले. शहरात पावसाळ्यामध्ये डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी पालिका सतर्क आहे. विविध भागात औषध फवारणी, धूर फवारणी करण्यात येत आहे. आशा सेविका आणि मुकादम यांच्यावतीने सर्व्हे करण्यात येत आहे. पालिकेकडे धूर फवारणीसाठी चार मशीन होत्या. त्याचा वापर करण्यात येत होता; मात्र आधुनिक पद्धतीची दोन मशीन पालिकेने खरेदी केली आहेत. या मशीनमध्ये पाण्याची टाकी समाविष्ट असून, धुराबरोबरच बाष्पनिर्मिती होते. त्यामुळे धूर जमिनीबरोबर जास्त वेळ राहतो. परिणामी, डासांचे निर्मूलन करण्यासाठी नवीन मशीन अधिक प्रभावीपणे काम करीत आहे. नवीन मशीनची चाचणी विजय वाटेगावकर यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. नवीन मशीनची किंमत प्रत्येकी ३२ हजार रुपये असून, एकूण सहा मशीन पालिकेकडे झाल्या आहेत.

Web Title: Smoke spraying by modern fogging machine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.