शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

Wai News: वऱ्हाड घेऊन निघालेल्या खासगी बसच्या इंजिनमधून धूर, चालकाच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2022 18:20 IST

चालकाने प्रसंगावधान ओळखून बस रस्त्याच्या कडेला उभी करून गाडीतील नवरीसह सर्व प्रवाशांना खाली उतरविले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.

वाई : महाबळेश्वरहून वाईच्या दिशेने येणाऱ्या वऱ्हाडाच्या खासगी बसला बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास पसरणी घाट उतरून वाई बसस्थानक परिसरात आल्यानंतर आग लागली. इंजिनमधून अचानक धुराचे लोट येऊ लागल्याने चालक सतर्क झाला. यामध्ये जीवितहानी झाली नसली तरी, गाडीचे नुकसान झाले.याबाबत माहिती अशी की, महाड येथून लग्नाच्या वऱ्हाडींना घेऊन खासगी बस (एमएच ०६ बीडब्ल्यू ८००८) ही वाई-पसरणी घाट उतरून लग्नाच्यास्थळी निघाली होती. वाईमध्ये एसटी बसस्थानक परिसरात ही बस आली असता, बसमधून धूर येत असल्याचे नागरिकांनी चालकास सांगून सतर्क केले. चालकाने प्रसंगावधान ओळखून बस रस्त्याच्या कडेला उभी करून गाडीतील नवरीसह सर्व प्रवाशांना खाली उतरविले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.

दरम्यान, नागरिकांनी व पोलीस प्रशासनाने वाई पालिकेच्या अग्निशमन दलाला संपर्क साधला. घटनेचे गांभीर्य ओळखून वाई पालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण केले. वाई पालिकेच्या अग्निशमन दलाला अर्ध्या तासात आग आटोक्यात आणण्यात यश आले. या घटनेमुळे वाई-पाचगणी रस्त्यावर दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरwai-acवाईfireआग