रयत इंग्लिश मीडियममध्ये हसत-खेळत शिक्षण
By Admin | Updated: July 14, 2015 21:41 IST2015-07-14T21:41:34+5:302015-07-14T21:41:34+5:30
सातारा : ‘लोकमत’मुळे विद्यार्थ्यांना वाचनाची आवड

रयत इंग्लिश मीडियममध्ये हसत-खेळत शिक्षण
सातारा : विद्यार्थ्यांचे शिक्षण हसत-खेळत व्हावे म्हणून येथील रयत इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचबरोबर ‘लोकमत’मुळे या शाळेतील विद्यार्थ्यांच्यात वाचनाची आवड निर्माण झाली आहे. वातावरण टेन्शनमुक्त ठेवण्याचा प्रयत्न असल्याने पालकांचा ओढा शाळेकडे वाढला आहे. २०१३ मध्ये येथे रयत इंग्लिश मीडियम स्कूल सुरू झाले. विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असल्यामुळे शाळेचा नावलौकिक वाढला आहे. इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे मराठी वाचनाची आवड कमी होत असल्याची ओरड आहे. मात्र, या शाळेत मुलांना वाचनाची आवड लागावी म्हणून ‘लोकमत’ वृत्तपत्राचे दररोज वाचन करण्यात येते. ‘संस्कारांचे मोती जरा हटके’ या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध माहिती देण्यात येत असते. या माहितीमुळे येथील विद्यार्थ्यांच्यात ज्ञानाची भर पडू लागली आहे. या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी ‘लोकमत’च्या संस्कारांचे मोती या उपक्रमात सहभाग घेतला आहे. शाळेने नुकतीच पर्यावरणपूरक संदेश देण्यासाठी रॅली काढली होती. शाळेच्या वतीने पालकांसाठीही विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. (प्रतिनिधी)
‘लोकमत’मुळे मुलांत वाचनाची आवड निर्माण झाली आहे. ‘संस्कारांचे मोती’ या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्यात ज्ञानाची भर पडली आहे. शाळेत हसत-खेळत शिक्षण देण्याचा प्रयत्न असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांचा ओढा या शाळेकडे वाढला आहे.
-मेघा पवार, मुख्याध्यापिका