दहिवडीत नारायण राणेंविरोधी घोषणाबाजी; शिवसैनिकांकडून निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:44 IST2021-08-25T04:44:00+5:302021-08-25T04:44:00+5:30
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या विधानाचे तीव्र पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले आहेत. माण तालुक्यात ...

दहिवडीत नारायण राणेंविरोधी घोषणाबाजी; शिवसैनिकांकडून निषेध
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या विधानाचे तीव्र पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले आहेत. माण तालुक्यात उपजिल्हाप्रमुख संजय भोसले, तालुकाप्रमुख बाळासाहेब मुलाणी, म्हसवड शहर प्रमुख राहुल मंगरुळे यांच्या नेतृत्वाखाली घोषणाबाजी करत शासकीय विश्रामगृहापासून पोलीस ठाण्यापर्यंत मोर्चा काढण्यात आला. या वेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी, या मागणीचे निवेदन या वेळी सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांना देण्यात आले. या वेळी सुभाष काटकर, अमित कुलकर्णी, प्रवीण कट्टे, सुनील मगर, महादेव काळुखे, संभाजी जगदाळे, संदीप जाधव, वैभव गोसावी, नितेश गोसावी, प्रवीण भोसले, सूरज जाधव, गणेश गोसावी, लखन जाधव, प्रवीण गोसावी, सोनू मदने, महावीर कासार, अथर्व रासने आदी शिवसैनिक उपस्थित होते.