कोरेगावात चप्पल-बूट दुकानाला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:40 IST2021-04-24T04:40:36+5:302021-04-24T04:40:36+5:30

कोरेगाव : शहरातील साखळी पुलानजिक असलेल्या बाबुलाल लुणिया यांच्या चप्पल-बूट दुकानाला शुक्रवारी सायंकाळी चारच्या सुमारास आग लागली. दुकानातील सर्व ...

Slipper-shoe shop on fire in Koregaon | कोरेगावात चप्पल-बूट दुकानाला आग

कोरेगावात चप्पल-बूट दुकानाला आग

कोरेगाव : शहरातील साखळी पुलानजिक असलेल्या बाबुलाल लुणिया यांच्या

चप्पल-बूट दुकानाला शुक्रवारी सायंकाळी चारच्या सुमारास आग लागली. दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले. नागरिकांच्या सतर्कतेमुळे आग वेळीच आटोक्यात आणल्याने शेजारील अन्य दुकानांना झळ पोहोचली नाही. कोरेगाव पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.

याबाबत माहिती अशी की, बाबुलाल लुणिया यांचे अनेक वर्षांपासून चप्पल-बूट विक्री दुकान आहे. या दुकानावरच त्यांच्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह चालतो. लॉकडाऊनमुळे दुकान काही दिवसांपासून बंद आहे. शुक्रवारी सायंकाळी चारच्या सुमारास अचानक या दुकानातून काळा धूर बाहेर पडू लागला. ही बाब नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी नगरपंचायतीला माहिती देऊन पाण्याचे टँकर्स मागविले. पाण्याच्या फवार्‍यामुळे आग आटोक्यात आणण्यात आली. मात्र तोपर्यंत दुकानातील सर्व सााहित्य जळून खाक झाले. याप्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.

Web Title: Slipper-shoe shop on fire in Koregaon