शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर रात्रीच हल्ला? नेतन्याहू यांच्या विमानाचं हवेत उड्डाण; ५० ठिकाणं अमेरिकेच्या हिटलिस्टवर
2
इराण-अमेरिका युद्धाची शक्यता? तेहरानच्या इशाऱ्यानंतर कतारमधील अमेरिकन हवाई तळ केले रिकामे
3
ट्रम्प यांच्या टॅरिफवर आज कोणताही निर्णय नाही, अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी दुसऱ्यांदा पुढे ढकलली
4
Daryl Mitchell च्या शतकासह यंगची 'विल पॉवर'! टीम इंडियावर पलटवार करत न्यूझीलंडनं साधला बरोबरीचा डाव
5
Daryl Mitchell Hundred : डॅरिल मिचेलची कडक सेंच्युरी; किंग कोहलीच 'नंबर वन' स्थान धोक्यात!
6
अमेरिकेने केली इराणची कोंडी, चारही बाजूंनी घेरले; 'या' देशांमध्ये लष्करी तळ...
7
हजारीबागमध्ये भीषण बॉम्ब ब्लास्ट, तिघांचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी
8
अमेरिकेच्या टॅरिफ धोरणावर आज रात्री फैसला; ट्रम्प यांच्याविरोधात निकाल गेल्यास काय घडू शकतं?
9
शिंदेंच्या उमेदवाराच्या घरावर मतदानाआधी दगडफेक; खिडक्या फोडल्या, खुर्च्या तोडल्या, प्रचंड राडा
10
मैत्री मैत्रीच्या ठिकाणी...! युद्धात इराणला साथ देणार नाही चीन? कारण काय?
11
धक्कादायक ! नागपुरात बाप झाला सैतान,पत्नीकडे ताबा जाऊ नये म्हणून पोटच्या मुलीची हत्या
12
लहानपणीची गोंडस मुलगी आता झालीये सुपरहॉट, रेड बॅकलेस ड्रेसमध्ये सारा अर्जुनचा किलर लूक!
13
"JJD हा लालूंचा खरा पक्ष"; राजद विलीनीकरणावर तेजप्रताप यांची तेजस्वींना थेट ऑफर
14
Petrol कार्सच्या तुलनेत Diesel कार्स जास्त मायलेज का देतात? जाणून घ्या यामागील विज्ञान...
15
बांगलादेशचा आडमुठेपणा! भारतात टी-२० वर्ल्डकप खेळण्यास नकार; आता आयसीसीकडे आहेत ३ पर्याय!
16
IND vs NZ : हर्षित राणानं ऑफ स्टंप उडवत डेवॉन कॉन्वेचा केला करेक्ट कार्यक्रम! गंभीरने अशी दिली दाद
17
मुस्लिमबहुल प्रभागांत रंगणार काँग्रेस-एमआयएम सामना! १३ जागांसाठी काँग्रेसची धडपड, शिंदेसेना चारही जागा राखणार?
18
डोंबिवलीत भाजपा अन् शिंदेसेनेत जोरदार राडा; ५ जणांना अटक, जखमींवर रुग्णालयात उपचार
19
Video - ई-रिक्षातील तरुणाचं अश्लील कृत्य; रणरागिणीने रस्त्यावरच घडवली चांगलीच अद्दल
20
"विना परवाना शस्त्र वाटणार, ज्याला हवं त्याने..."; योगी सरकारच्या मंत्र्याचं धक्कादायक विधान
Daily Top 2Weekly Top 5

झोपायला भुई अन् पांघरायला आभाळ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 23:10 IST

नितीन काळेल । लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्याच्या पूर्व भागातील आणि सोलापूर जिल्ह्यामधील मेंढपाळ दुष्काळामुळे सातारा परिसरात वास्तव्यास ...

नितीन काळेल ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : जिल्ह्याच्या पूर्व भागातील आणि सोलापूर जिल्ह्यामधील मेंढपाळ दुष्काळामुळे सातारा परिसरात वास्तव्यास आहेत. ढेकळाच्या रानात पाल उभारून मेंढरांबरोबर दिवस ढकलत आहेत. झोपायला भुई आणि पांघरायला आभाळ अशी त्यांची स्थिती आहे. आता तर गावाकडे पाण्याची वाणवा म्हणून सुटी लागल्याने शाळकरी मुलंही आई-वडिलांबरोबर मेंढरामागच्या फुफाट्यात जीवनाचा अर्थ शोधू लागलीत.सातारा जिल्ह्याचा पूर्व भाग आणि सोलापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात दुष्काळ पाचवीलाच पुजलेला. या भागात मेंढपाळ वर्ग अधिक. त्यामुळे लहान जनावरे जगविण्यासाठी काही मेंढपाळ वर्ग दरवर्षी दिवाळी करून जनावरे जगविण्यासाठी गाव सोडतो. उन्हाळा संपेपर्यंत हा मेंढपाळ वर्ग मराठवाडा आणि सातारा, वाई, पाटण परिसरात येतो. वर्षानुवर्षांचे हे गणित; पण गेल्यावर्षी पाऊसच पडला नाही. त्यामुळे अनेक मेंढपाळांनी गावाला वृद्ध आई-वडील, शाळकरी मुलांना सोडून मेंढरामागे भटकंती सुरू केली. माण तालुक्यातील पळसावडेचे पोपट रामचंद्र काळे, अक्षय भगवान धुलगुडे आणि नितीन भगवान शेळके यांचा समावेश आहे. तर सोलापूर जिल्ह्याच्या फोंडशिरसचे (ता. माळशिरस) तात्याबा जगू शेळके हे वास्तव्यास आहेत. हे सर्वजण धावडशी परिसरात ढेकळाच्या रानात पाल उभी करून पावसाळा सुरू होईपर्यंतचे दिवस मोजत आहेत. सकाळी एकदा मेंढरं वागरंबाहेर काढली की दिवसांत किती किलोमीटर चाऱ्यासाठी फिरावं लागंल, हेही त्यांना माहीत नसतं. मेंढराच्या एका-एका खांडव्यामागं दोघं-तिघं तरी राहतात. कारण, आजूबाजूला पीक असल्यानंतर मेंढरं पिकात शिरण्याचा धोका असतो. त्यामुळे सर्वांना विविध बाजूला थांबून हा हू करत मेंढरं चारावी लागतात. सायंकाळी पालावर गेल्यावर कोणी विहिरीतून किंवा जवळपास हातपंप असेल तर पाणी आणतो. कोणी, मेंढ्या वागरत बसवतो. तर कोणी तेल, मीठ भाजी आणण्यासाठी एखादं खेडेगाव जवळ करतो, अशी स्थिती.सायंकाळी मग सर्वजण एकत्र येत भाकरीचा एक-एक घास तोंडात घालत उद्या कुठं मेंढर घेऊन जायचं, यावर चर्चा करतात. भाकरी खाऊन झाली की तिथंच ढेकळात काहीतरी चादर, वाकळ टाकतात आणि झोपतात. अंगावर काही घेत नाहीत, घेतलं तरी दिवसभराच्या फिरण्यानं झोप कधी लागते तेही कळत नाही. झोपायला भुई आणि पांघरायला आभाळ यातच सकाळ कधी होते, ते ही समजत नाही. उठल्यानंतर मग नव्या दिवसाची नवी तयारी सुरू होते.सातारा परिसरात आलेल्या मेंढपाळांचं हे जीवन असलं तरी आता त्यांच्याबरोबर मुलंही गावावरुन आलीत. शाळेला उन्हाळ्याची सुटी लागलीय; पण गावाला पाणी नाही म्हणून ही मुलं वडील, नातेवाइकांच्या मागं रान तुडवू लागलीत.गावातील माणसाला रानात राहू वाटतं का ?सातारा परिसरात वास्तव्यास असलेल्या अक्षय धुलगुडे हा आईबरोबर मेंढ्या घेऊन आलाय. आता दहावीची परीक्षा दिलेली बहीणही साताºयाकडं आली आहे. गावाकडं दुष्काळ असल्यानं तिला इथं करमतं का? असा प्रश्न केला. यावर ती म्हणाली, ‘गावाकडं राहणाºया माणसाला रानात इथं करमंल का?’ हे तिचं उत्तर खरंच काळजाला चर्रर्र करून जाणारंच ठरलं.मेंढरं बसविण्यासाठी पैसे किंवा धान्य...सातारा परिसरातील अनेक भाग बागयती. त्यामुळे येथे मेंढरांना खाण्यासाठी चारा आहे. बाभळीचा डहाळा, मोकळी आणि पिकं काढलेल्या रानात मेंढरं चरतात. तसेच कोणाही शेतकऱ्यांच्या रानात रात्री मेंढरं बसवली जातात. एक रात्र मेंढ्या बसविण्यासाठी मेंढपाळांना २०० ते २५० रुपये किंवा दोन पायली धान्य मिळते.