टाळ्यांचा गजर; हास्याचे फवारे!

By Admin | Updated: November 18, 2014 23:31 IST2014-11-18T20:57:55+5:302014-11-18T23:31:31+5:30

दीपक देशपांडे यांच्या ‘हास्यसम्राट’ कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

Slang alarm; Laughter balls! | टाळ्यांचा गजर; हास्याचे फवारे!

टाळ्यांचा गजर; हास्याचे फवारे!

कऱ्हाड : येथील सखी सदस्यांकरीता आयोजीत केलेल्या प्रा. दीपक देशपांडे यांच्या ‘हास्यसम्राट’ कार्यक्रमाला सखींनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.अन्नपुर्णा सेवाभावी संस्था व आर. के. मरिन करीअर अ‍ॅकेडमी यांनी प्रायोजकत्व स्विकारलेल्या या कार्यक्रमप्रसंगी आर. के. मरीन करीअर अ‍ॅकेडमीचे राहुल खडके, सिमा खडके, अन्नपुर्णा सेवाभावी संस्थेचे प्रमोद सावंत, शितल सावंत, धनश्री ड्रेस मटेरीअल फर्मच्या ज्योती कोपर्डे, रूपसंगम साडीज अ‍ॅन्ड ड्रेस मटेरीअलचे दुर्गेश पुरोहीत यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाच्या मध्यंतरात लकी ड्रॉ काढण्यात आला. त्यामध्ये विजेत्यांना चंदुकाका सराफ यांच्यातर्फे सुवर्णनथ, रूपसंगम साडीज अ‍ॅन्ड ड्रेस मटेरीअल यांच्याकडून साडी व ड्रेस मटेरीअल, स्वर्ग ज्वेलर्सकडून १ ग्रॅम सोन्याची बँगल्स, मिरॅकल ब्युटी पार्लरकडून ५० ब्लिच व धनश्री लेडीज वेअर यांच्याकडून ६ कुर्ती देण्यात आल्या. (प्रतिनिधी)

कऱ्हाड येथे लोकमत सखी मंचच्यावतीने आयोजीत कार्यक्रमाचे दिपप्रज्वलनाने उद्घाटन झाले. यावेळी राहुल खडके, सिमा खडके, प्रमोद सावंत, शितल सावंत, ज्योती कोपर्डे, दुर्गेश पुरोहीत आदी उपस्थित होते.

Web Title: Slang alarm; Laughter balls!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.