‘कृष्णा’ निवडणुकीतून सोमवारी सहा जणांची माघार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:51 IST2021-06-16T04:51:21+5:302021-06-16T04:51:21+5:30
यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक २९ जून रोजी होत आहे. या निवडणुकीत अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांना माघारीसाठी ...

‘कृष्णा’ निवडणुकीतून सोमवारी सहा जणांची माघार
यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक २९ जून रोजी होत आहे. या निवडणुकीत अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांना माघारीसाठी १७ जूनपर्यंत मुदत आहे. दरम्यान, सोमवारी (दि. १४) सहा उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत.
कृष्णा कारखाना निवडणुकीत तिरंगी लढतीची शक्यता निर्माण झाली आहे. सहकार, रयत व संस्थापक अशा तीन पॅनेलमध्ये ही निवडणूक होऊ शकते. त्यामुळे नक्की कोणाचे उमेदवारी अर्ज कोणत्या पॅनेलमधून राहणार? कोणाचे अर्ज माघारी घेतले जाणार याची उत्सुकता लागून राहिली आहे.
दरम्यान, सोमवारी काले- कार्वे गट नंबर दोनमधून संजय पोपटराव जाधव (आटके), अमित हंबीरराव काळे (आटके) रेठरे - येडेमच्छिंद्र गट नंबर ६ मधील संतोष बबन जाधव (रेठरे खुर्द ) वडगाव -दुशेरे गट नंबर १ मधून सुभाष विठ्ठल लोकरे (येरवळे) नेर्ले-तांबवे गट नंबर ३ मधून संभाजी शामराव पाटील (वाठार) व महिला राखीव गटातून शोभा मारुती मोहिते (बेलवडे बुद्रुक) या ६ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत.