सहा दुकाने सील; वीस दुचाकी जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:29 IST2021-06-04T04:29:23+5:302021-06-04T04:29:23+5:30
दरम्यान, पोलीस उपअधीक्षक डॉ. रणजित पाटील यांच्यासह पथकाने केलेल्या या धडक कारवाईत वीसपेक्षा जास्त दुचाकी ताब्यात घेण्यात आल्या आहेत. ...

सहा दुकाने सील; वीस दुचाकी जप्त
दरम्यान, पोलीस उपअधीक्षक डॉ. रणजित पाटील यांच्यासह पथकाने केलेल्या या धडक कारवाईत वीसपेक्षा जास्त दुचाकी ताब्यात घेण्यात आल्या आहेत. याशिवाय विनामास्क फिरणाऱ्यांवरही पोलिसांनी कारवाई केली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी कडक निर्बंध घातले आहेत. किराणासह सर्व दुकाने पूर्णपणे बंद ठेवण्याचा आदेश आहे. मात्र, तरीही शहरातील मार्केट यार्ड परिसरात अनेक दुकानांमधून विनापरवाना साहित्याची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार गुरुवारी सकाळी अचानकपणे पोलीस फौजफाट्यासह पोलीस उपअधीक्षक रणजित पाटील यांच्यासह वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक विजय गोडसे यांनी मार्केट यार्ड परिसरात कारवाईचा सपाटा लावला. अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली अनावश्यक वस्तू विकणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करीत सहा दुकाने सील केली. तसेच त्यांना प्रत्येकी तीन हजार रुपयांचा दंड करण्यात आला. याशिवाय जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करीत विनाकारण फिरणाऱ्या वीस दुचाकी पोलिसांनी ताब्यात घेतल्या.
- कोट
कोणीही जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करू नये. वैयक्तिक स्वार्थ पाहत राहिलो तर कोरोना नियंत्रणात आणणे अडचणीचे ठरेल. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कारवाई करून गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली कोणीही अनावश्यक वस्तूंची विक्री करू नये.
- बी. आर. पाटील
पोलीस निरीक्षक