बुध हल्लाप्रकरणी सहा जण ताब्यात
By Admin | Updated: August 18, 2015 00:48 IST2015-08-18T00:48:22+5:302015-08-18T00:48:22+5:30
दोघांना कोठडी : चौघे खारघरमध्ये जाळ्यात

बुध हल्लाप्रकरणी सहा जण ताब्यात
पुसेगाव : बुध (करंजओढा), ता. खटाव येथील रामोशी वस्तीवर शनिवारी (दि. १५) झालेल्या सशस्त्र हल्ल्यातील ६ आरोपींना पकडण्यात पुसेगाव पोलिसांना यश मिळाले असून, अद्याप फरारी असलेल्या आरोपींच्या मुसक्या लवकरच आवळणार असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुरेश घाडगे यांनी सांगितले.
महिपती अंतू जाधव व अशोक महिपती जाधव या दोन संशयितांना वडूज न्यायालयाने दि. २० पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे, तर चार संशयित खारघर येथे पोलिसांच्या जाळ्यात अडकले. स्वातंत्र्यदिनी झालेल्या या भीषण हल्ल्यात दोन तरुणांचा निर्घृण खून झाला होता. मृतांत दिलीप मल्हारी जाधव (वय २७), शामराव कोंडिबा जाधव (वय २६, दोघे रा. करंजओढा) यांचा समावेश आहे. शामराव यांच्यावर रविवारी रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. या हल्ल्यात आणखी पाचजण गंभीर जखमी झाले असून, एकाची प्रकृती अद्याप चिंंताजनक आहे. जखमींवर सातारा येथील शासकीय व खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
खबऱ्याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार या घटनेतील चार संशयित खारघर (मुंबई) येथील हिरानंद सर्कल भागात फिरत होते. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. समीर मोहन जाधव, योगेश रायसिंंग जाधव, सौरभ विलास जाधव व कमलेश ज्ञानदेव जाधव अशी त्यांची नावे आहेत.
शामराव कोंडिबा जाधव व संदीप बबन जाधव यांच्यासह अन्य दोघांवर यांच्या राहत्या घराजवळ ज्ञानदेव शंकर जाधव, रायसिंंग शंकर जाधव, कमलेश ज्ञानदेव जाधव, योगेश रायसिंंग जाधव, नीलेश ज्ञानदेव जाधव, विलास शंकर जाधव, सौरभ विलास जाधव, मंगेश मोहन जाधव, समीर मोहन जाधव, श्रीपती महिपती जाधव, महिपती अंतू जाधव व अशोक महिपती जाधव (सर्व रा. करंजओढा, बुध) यांनी सशस्त्र हल्ला केला होता. तलवार, कुऱ्हाड, लोखंडी पाईप, हॉकी स्टिक व काठ्यांचा वापर या हल्ल्यात करण्यात आला. हा हल्ला पूर्ववमन्यस्यातून झाला असल्याचे पुढे आले आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी चोपडे व सहायक पोलीस निरीक्षक सुरेश घाडगे यांच्या मार्गर्दानाखाली उपनिरीक्षक उध्दव वाघ तपास करीत आहेत. (वार्ताहर)
घटनास्थळी
अद्याप तणाव
या घटनेमुळे घटनास्थळी व बुध परिसरात अद्याप तणावाचे वातावरण असून, मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यामध्ये धडक कृतिदलाची तुकडी,प् ाोलीस कर्मचारी डोळ्यात तेल घालून पहारा करत आहेत. या घटनेत सुमारे १२ जणांवर गुन्हा दाखल असून, इतर १५ ते २० अनोळखी जणांचा या घटनेत आरोपी म्हणून समावेश आहे.