जिल्ह्यात कोरोनामुळे सहाजणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:34 IST2021-04-05T04:34:39+5:302021-04-05T04:34:39+5:30
सातारा : जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरू असून, गत चोवीस तासात तब्बल सहाजणांचा मृत्यू झाला. यामुळे बळींचा आकडा १ हजार ...

जिल्ह्यात कोरोनामुळे सहाजणांचा मृत्यू
सातारा : जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरू असून, गत चोवीस तासात तब्बल सहाजणांचा मृत्यू झाला. यामुळे बळींचा आकडा १ हजार ९१८ झाला असून, नवे ४९८ रुग्ण आढळून आले. बाधितांचा आकडा ६७ हजार ९६१ वर पोहोचला आहे.
जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा कहर होऊ लागल्याने जिल्हावासीयांसाठी ही धोक्याची घंटा आहे. जिल्ह्यात रुग्ण वाढू लागल्याने प्रशासनावरचा ताण वाढू लागलेला आहे. रविवारी जिल्ह्यामध्ये १ हजार ५७९ जणांच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली. यामध्ये ४९८ जण बाधित आढळून आले आहेत. यामध्ये सहाजणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये मायणी, ता. खटाव येथील ८० वर्षीय पुरुष, कोरेगाव येथील ७० वर्षीय महिला, अंबवडे, ता. सातारा येथील ६५ वर्षीय महिला, गोंदवले, ता. माण येथील ८६ वर्षीय पुरुष, सैदापूर, ता. सातारा येथील ७० वर्षीय पुरुष, तर पाडळी, ता. सातारा येथील ६८ वर्षीय महिलेचा समावेश आहे.
गत महिनाभरापासून कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागल्याने प्रशासनाची पळापळ सुरू झाली आहे. कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी प्रशासनाकडून हरतऱ्हेचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, कोरोनाची रुग्णसंख्या अधिकच वाढतेय. त्यामुळे प्रशासन आणखीनच चिंतेत आहे.
जिल्ह्यात सध्या ६७ हजार ७९१ बाधित रुग्ण आढळून आले असून, यापैकी १ हजार ९१८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर आतापर्यंत ६० हजार ९०५ जण कोरोनातून मुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.