तारगाव येथे जुगार खेळणाऱ्या सहा जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:38 IST2021-05-26T04:38:50+5:302021-05-26T04:38:50+5:30

सातारा / रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील तारगाव येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर सोमवारी रहिमतपूर पोलिसांनी छापा टाकून जुगार खेळणाऱ्या ...

Six gamblers arrested in Targaon | तारगाव येथे जुगार खेळणाऱ्या सहा जणांना अटक

तारगाव येथे जुगार खेळणाऱ्या सहा जणांना अटक

सातारा / रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील तारगाव येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर सोमवारी रहिमतपूर पोलिसांनी छापा टाकून जुगार खेळणाऱ्या सहाजणांना अटक केली. प्रकाश घाडगे, संजय कोरडे, दत्तात्रय मोरे, कृष्णात मोरे, दादासोा शिंदे, सुशांत भोसले अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

या कारवाईत पोलिसांनी १ लाख ३ हजार ८४० रुपयांची रोकड, पाच दुचाकी आणि जुगाराचे साहित्य जप्त केले आहे. दरम्यान, तारगाव परिसरातही ही कारवाई करण्यात आल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. अटक करण्यात आलेल्यांपैकी पाचजण युवक आहेत.

याबाबतची अधिक माहिती अशी की, कोरेगाव तालुक्यातील तारगाव गावच्या हद्दीत गायरानजवळ असणाऱ्या करंजाच्या झाडाखाली काहीजण जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी याची सत्यता पडताळल्यानंतर येथे सापळा रचून छापा टाकला. पोलिसांनी प्रकाश मोहन घाडगे (वय ३३), संजय राजेंद्र कोरडे (वय ३०), दत्तात्रय सुरेश मोरे (वय २४), कृष्णात बळवंत मोरे (वय ४२), दादासोा वसंत शिंदे (वय ५२), सुशांत सुधाकर भोसले (वय २२) या सर्वांवर गुन्हा दाखल करून सोमवार, दि. २४ रोजी रात्री पावणेअकरा वाजण्याच्या सुमारास अटक केली. दरम्यान, हे सर्व तारगाव येथील रहिवासी आहेत. रहिमतपूर पोलिसांनीच हा गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Six gamblers arrested in Targaon