पुसेगावमध्ये साडेसहा हजार लिटर औषध फवारणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:41 IST2021-04-23T04:41:13+5:302021-04-23T04:41:13+5:30
पुसेगाव : खटाव तालुक्याच्या उत्तर भागात कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत आहे. पुसेगाव येथे कोविड केअर सेंटर असल्याने आसपासच्या पंचक्रोशीतील ...

पुसेगावमध्ये साडेसहा हजार लिटर औषध फवारणी
पुसेगाव : खटाव तालुक्याच्या उत्तर भागात कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत आहे. पुसेगाव येथे कोविड केअर सेंटर असल्याने आसपासच्या पंचक्रोशीतील रुग्ण उपचारासाठी दाखल केले आहेत. त्यामुळे कोरोना संक्रमण रोखण्यासाठी पुसेगाव ग्रामपंचायतीच्यावतीने गावात सुमारे साडेसहा हजार लिटर औषध फवारणी ट्रॅक्टर मशीनद्वारे करण्यात आली.
पुसेगाव ग्रामपंचायत, ग्रामस्तरीय सुरक्षा समिती आरोग्य, महसूल व पोलीस प्रशासन कोरोना संक्रमण रोखण्यासाठी प्रयत्नशील आहेत. सध्या पुसेगाव कोविड सेंटरमध्ये ६८ रुग्ण उपचार घेत आहेत, तर काही रुग्ण होम आयसोलेशनमध्ये उपचार सुविधा घेत आहेत. गेल्या आठवड्यात कोरोनाबधितांचा आकडा वाढल्याने सध्या गावातील अंतर्गत रस्ते, शाळा, महाविद्यालय परिसर, तसेच गल्ली-बोळात फवारणी करण्यात येत आहे. ज्या भागात नागरिकांचा सतत वावर असतो, अशा पोलीस ठाणे, बँका, पोस्ट ऑफिस, मुख्य बाजारपेठ या भागातही औषध फवारणी करण्यात आली आहे.
फोटो केशव जाधव यांनी मेल केला आहे.
पुसेगाव येथे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ग्रामपंचायतीच्यावतीने औषध फवारणी करण्यात येत आहे. (छाया : केशव जाधव)