जमिनीवर आपटून बहिणीच्या पतीचा खून कोपर्डे हवेलीतील घटना : मेहुण्यावर गुन्हा
By Admin | Updated: May 13, 2014 23:43 IST2014-05-13T23:43:08+5:302014-05-13T23:43:27+5:30
कºहाड : बहिणीच्या पतीला जमिनीवर आपटून त्याचा खून केल्याप्रकरणी मेहुण्यावर कºहाड तालुका पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

जमिनीवर आपटून बहिणीच्या पतीचा खून कोपर्डे हवेलीतील घटना : मेहुण्यावर गुन्हा
कºहाड : बहिणीच्या पतीला जमिनीवर आपटून त्याचा खून केल्याप्रकरणी मेहुण्यावर कºहाड तालुका पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. कोपर्डे हवेली (ता. कºहाड) येथे ही घटना घडली. परशुराम दिराप्पा राठोड (वय २९ मूळ रा. परतशुनाई तांडा, ता. राजवा कोयूर, जि. यादगिरी, कर्नाटक) असे खून झालेल्याचे नाव आहे. तर याप्रकरणी मेहुणा अमरिश रामाणी चव्हाण (रा. परतशुनाई तांडा, कर्नाटक) याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत मृत परशुरामची पत्नी व आरोपी अमरिशची बहीण चांदीबाई राठोड हिने पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परतशुनाई तांडा-कर्नाटक येथील परशुराम राठोड हा पत्नी चांदीबाई व मुलीसमवेत कºहाड तालुक्यातील कोपर्डे हवेली येथे मजुरीसाठी आला होता. त्याचठिकाणी परशुरामचा मेहुणा अमरिश हासुद्धा मजुरीसाठी आला होता. काही दिवसांपूर्वी परशुरामची मुलगी अमरिशच्या झोपडीसमोर शौचास बसली. त्यावरून परशुराम व अमरिश यांच्यात वादावादी झाली. वादावादीदरम्यान अमरिशने परशुरामला जमिनीवर आपटले. उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. (प्रतिनिधी)