शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Satara Crime: स्टेटस् ठेवल्याने भाऊ रागवला; बहिणीने संपविले जीवन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 12:51 IST

तू स्टेट्स ठेवलेस अन् तू न सांगता फिरायला का गेलीस म्हणून भाऊ संतापला

सातारा : घरात न सांगता ती फिरायला गेली. त्यानंतर तिने माेबाइलवर स्टेट्स ठेवला. भावाने हे पाहिल्यानंतर तिच्यावर तो संतापला. भाऊ रागावून बोलल्याचे तिच्या जिव्हारी लागल्याने तिने विषारी औषध प्राशन करून जीवन संपवले. ही धक्कादायक घटना सोमवार, दि. ७ रोजी सायंकाळी सदरबझार, लक्ष्मी टेकडी येथे घडली.मातम्मा भीमाशंकर शिंगे (वय २१, सध्या रा. लक्ष्मी टेकडी, सदर बझार सातारा, मूळ रा. कर्नाटक) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मातम्मा ही सदर बझारमधील लक्ष्मी टेकडी परिसरात आपल्या कुटुंबासह राहत होती. सोमवारी सकाळी ती सातारा शहर परिसरात फिरण्यासाठी गेली होती. मात्र, बाहेर जाताना तिने घरात सांगितले नाही. फिरायला गेल्यानंतर तिने तिचे फोटो काढले. हे फोटो तिने तिच्या माेबाइलवर स्टेट्स ठेवले. हे स्टेट्स तिच्या भावाने पाहिल्यानंतर भाऊ संध्याकाळी घरी आला. तू स्टेट्स ठेवलेस अन् तू न सांगता फिरायला का गेलीस म्हणून भाऊ संतापला. याचा राग तिला अनावर झाल्याने तिने विषारी औषध प्राशन केले. घरातल्यांनी तिला तातडीने साताऱ्यातील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान तिचा रात्री मृत्यू झाला.सातारा शहर पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असून, पोलिस उपनिरीक्षक अनिल जायपत्रे हे अधिक तपास करीत आहेत.