सायरन वाजला की स्थानिक धावतात घाटाकडे!

By Admin | Updated: April 19, 2015 00:39 IST2015-04-19T00:39:09+5:302015-04-19T00:39:09+5:30

खंबाटकी घाट जीवघेणा : दरीत कसरत, प्रवाशांना उपचारास नेण्यासाठी धडपड

Siren said that the local runway runs towards the deficit! | सायरन वाजला की स्थानिक धावतात घाटाकडे!

सायरन वाजला की स्थानिक धावतात घाटाकडे!

दशरथ ननावरे, खंडाळा : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील खंबाटकी घाटाचा प्रवास म्हणजे प्रवाशांना जीवघेणा ठरत आहे. घाटातील सुविधांचा अभाव व महामार्ग प्राधिकरणाचे दुर्लक्ष, यामुळे घाटातला रस्ता बिकट वाटत आहे. वारंवार घडणाऱ्या अपघातामुळे खंडाळा पोलीस स्टेशनसह स्थानिक ग्रामस्थांना दक्ष राहावे लागत आहे. या महामार्गावर कुठेही अपघात घडला की रुग्णवाहिकेचा सायरनचा आवाज ऐकून स्थानिक लोक घाटाकडे धाव घेत असतात. यात सर्वात पुढे असते. ते खंबाटकी मदत पथकातील सहकारी आणि मग सुरू होते. खंबाटकी घाटाच्या दरीतील कसरत, प्रवाशांचा जीव वाचविण्याची आणि त्यांना वेळीच वैद्यकीय उपचार मिळावेत, यासाठी त्यामुळे खंडाळा पारगाव ग्रामस्थ आणि खंबाटकीतील प्रवासी यांचं वेगळंच नातं रोज नव्या रूपाने पाहायला मिळते.
महामार्गावर राजवत हॉटेलच्यासमोर शुक्रवारी रात्री भरधाव वेगाने येणारी कार रस्त्याचा अंदाज न आल्याने पुलाच्या कठड्याला जोरदारपणे धडकली. कारचा चक्काचूर झालेला. जीवाच्या आकांताने प्रवाशांची बाहेर येण्याची धडपड सुरू होती. पण पुढे यायला कोण तयार होईना; पण खंडाळा पोलीस स्टेशनचे निरीक्षक अशोक शेळके आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी तातडीने पोहोचले. जखमी प्रवाशांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. क्रेनच्या साह्याने गाडी रस्त्यातून बाजूला काढून रस्त्यावरील सांडलेले डिझेल, काचा साफ करण्यासाठी रेस्क्यू टीमचे जवान रात्रीचेही काम करीत होते.
तत्पूर्वी याच मार्गावर घाटाजवळ एका सायकलस्वाराला धडक बसल्याने तो जखमी अवस्थेत पडला होता. त्यासाठीही पोलिसांची धावाधाव सुरू होती. रात्रीच्या एक वाजेपर्यंत पोलिसांचे काम सुरूच होते. सकाळी आठच्या सुमारास पुन्हा खंबाटकी घाटात कार दीडशे फूट दरीत गेल्याचा निरोप. पुन्हा पोलिसांचा मोर्चा घाटाकडे.
खंबाटकी मदत पथकाचे अध्यक्ष अजित यादव, युवराज ढमाळ, संतोष बावकर यांच्यासह सर्व एकवीस तरुणांची टीम मदतीसाठी धावल. खोल दरीत उतरून कारमधील लहान मुलांसह पती-पत्नीला बाहेर काढून उपचारासाठी दवाखान्यात नेण्यात आले; पण दरीतून कार काढणे मोठे जिकिरीचे काम. प्रत्येक वेळी हवालदार बाळू पवार हे मोठ्या निष्ठेने कार्य पार पाडतात. आजच्या अपघातातील कार कृष्णा क्रेनच्या साह्याने बाहेर काढण्यात आली. घाटाचा रस्ता, वळणे धोक्याची, महामार्गावर वाहनांची गर्दी त्यातूनही वाहतुकीची खोळंबा न करता सुरळीतपणे कार दरीतून काढण्यात आली. दिवसा उजेड असो किंवा रात्रीचा अंधार असो. पोलीस आणि मदत अपघातग्रस्तांना जीवदान देणारी ठरते. त्यामुळे हे काम अधिक महत्त्वाचे मानूनच सर्वजण काम करतात.


 

Web Title: Siren said that the local runway runs towards the deficit!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.