चोरट्यांकडून सिंगापूरचे चलन जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:20 IST2021-02-05T09:20:21+5:302021-02-05T09:20:21+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा: शाहूपुरी पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणला असून, पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. चोरट्यांकडून पोलिसांनी सिंगापूरचे ...

Singapore currency seized from thieves | चोरट्यांकडून सिंगापूरचे चलन जप्त

चोरट्यांकडून सिंगापूरचे चलन जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा: शाहूपुरी पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणला असून, पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. चोरट्यांकडून पोलिसांनी सिंगापूरचे ६५ डाॅलरचे चलन जप्त केले आहे.

विपुल तानाजी नलवडे (वय १९, रा. पिलेश्‍वरी नगर करंजे सातारा), जीवा नारायण वानखेडे (३१, रा. केसरकर पेठ सातारा) अशी संशयित चोरट्यांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शाहुपूरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन दिवसांपूर्वी घरफोडी झाली होती. यामध्ये सोन्याचे दागिने व सिंगापूर देशाचे परदेशी डॉलर चोरीस गेले होते. शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने घटनास्थळी भेट देऊन घरफोडी चोरीची माहिती घेतली. घरफोडी झालेली पद्धत पाहता ही चोरी सराईत चोरट्याने केली असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार पेट्रोलिंग करून अभिलेखावरील सराईत गुन्हेगारांच्या हालचालींची माहिती घेऊ लागले. दि. २७ रोजी गुन्हे प्रकटीकरण शाखेला रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार पिलेश्‍वरी कॅनॉलवर बसला असून त्याच्याकडे परदेशी डॉलर असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस तत्काळ त्याठिकाणी गेले. पोलिसांना पाहून संशयित पळून जाऊ लागला. पोलिसांनी पाठलाग करून त्यास पकडले. त्याची चौकशी केली असता त्याने आपले नाव विपुल नलवडे असे सांगितले. पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ सिंगापूर चलनाचे पन्नास, दहा व पाच असे तीन डॉलर सापडले.

त्याने सोन्याचे दागिने केसरकर पेठेतील जीवा वानखेडे या सोने विक्री एजंटाकडे दिल्याचे सांगितले. त्यानंतर त्यालाही अटक केली.

ही कारवाई पोलीस निरीक्षक संजय पतंगे, सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर, सहायक पोलीस निरीक्षक संदीप शितोळे, पोलीस हेडकॉन्स्टेबल हसन तडवी, पोलीस नाईक लैलेश अशोक फडतरे, अमित माने, स्वप्निल कुंभार, ओंकार यादव, आदींनी केली.

Web Title: Singapore currency seized from thieves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.