शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

silver oak attack: राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे 'फलटण बंद' ठेवून निषेध, आंदोलकांवर कडक कारवाईची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2022 18:26 IST

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शहरात रॅली काढून फलटण बंदचे आवाहन केले. अचानक बंद झाल्यामुळे अनेक दुकानदारांची व भाजीविक्रेत्यांची मोठी तारांबळ उडाली.

फलटण : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या मुंबई येथील बंगल्यावर झालेल्या हल्ल्याचे फलटण तालुक्यातही पडसाद उमटले. या हल्ल्याच्या निषेधार्थ आज, शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे फलटण बंद ठेवण्यात आला.मुंबई येथील सिल्व्हर ओक या खासदार शरद पवार यांच्या निवासस्थानी काल, शुक्रवारी संतप्त एसटी कर्मचाऱ्यांनी मोर्चा काढून चपला आणि दगडफेक केली होती. तसेच विरोधी घोषणा दिल्या होत्या. या घटनेचे पडसाद आज, शनिवारी फलटण तालुक्यात उमटले. विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची बैठक होऊन फलटण बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.रामराजे नाईक-निंबाळकर यांनी या घटनेचा निषेध व्यक्त करत चुकीच्या गोष्टींना सरकारने पायबंद घालावा व अशा गोष्टी पुन्हा होऊ नये, याबाबत दक्षता घेण्याचे आवाहन केले. तर, या घटनेचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे निषेध करत याबाबतचे निवेदन प्रांताधिकारी यांना देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी संतप्त भावना व्यक्त करून आंदोलकांवर कडक कारवाईची मागणी केली.यावेळी आमदार दीपक चव्हाण, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, ज्येष्ठ नेते सुभाषराव शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शहरात रॅली काढून फलटण बंदचे आवाहन केले. अचानक बंद झाल्यामुळे अनेक दुकानदारांची व भाजीविक्रेत्यांची मोठी तारांबळ उडाली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरST Strikeएसटी संपSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसphaltan-acफलटण