स्वाक्षरी असते सुप्तमनाचे प्रतिबिंब !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:28 IST2021-06-06T04:28:29+5:302021-06-06T04:28:29+5:30
काही सिग्नेचर वाइल्ड म्हणजे मोठ्या असतात. अशा सिग्नेचरमधली अक्षर विस्तारलेली असतात. अगदी पटकन वाचता येतात कारण शब्द मोठे असतात. ...

स्वाक्षरी असते सुप्तमनाचे प्रतिबिंब !
काही सिग्नेचर वाइल्ड म्हणजे मोठ्या असतात. अशा सिग्नेचरमधली अक्षर विस्तारलेली असतात. अगदी पटकन वाचता येतात कारण शब्द मोठे असतात. त्यांची स्वाक्षरीची एक अदब असते. त्यांचे विचार त्यांच्या सहीसारखे मोठे आणि विस्तारलेले असतात. नेहमी पुढे कसे जाता येईल याचाच विचार ते करत असतात. महत्त्वाकांक्षी व्यक्तिमत्त्व असून मोठं घर, मोठी गाडी, मोठं ऑफिस, नोकरी करत असेल तर बढती हवी असते, असे मोठे विचार असतात. आणि फक्त विचार नाही तर ही माणसं अफाट मेहनत घेतात, जिद्दीने पुढे जातात. असे लोक सगळ्यांशी मिळून मिसळून वागतात. त्यांचा मित्रपरिवार मोठा असतो. ते सोशल असतात. मोठे व्यवहार पाहणे आणि ते डिल करून घेणं याकडे अशा स्वाक्षरीच्या लोकांचं जास्त लक्ष असतं. यांचे विचार शार्प असतात, उगाच लहानलहान गोष्टीत अडकत नाहीत. आणि सर्वांत महत्त्वाचे त्यांची निर्णयक्षमता उत्तम असते. एखादा निर्णय चुकला आणि नुकसान झालं तरी ते निभावून घेऊन जातात. नुकसानातून पटकन बाहेर पडण्यासाठी उपाययोजना करायला सुरुवात करतात. उगाच बाऊ करत बसत नाहीत. अशी मंडळी मार्केटिंग, राजकारण, ह्यूमन रिसोर्स, व्यवसाय या क्षेत्रात प्रगती करतात. यांना प्रवास करायला आवडतो. पैसे खर्च करतानाही ते मोकळेपणाने पैसे खर्च करतात.
लहान सिग्नेचर करणारे लोक ही सीमित विचारांचे असतात. आहे त्यामध्ये ते समाधानी असतात. त्यांचे मित्रपरिवारदेखील मोजके असतात. पण नक्कीच ते विचार करून निवडतात म्हणून मित्रपरिवार चांगला असतो. आणि फॅमिलीला जास्त वेळ देतात, त्यांना अधिक महत्त्व देतात. प्रत्येक गोष्टीत डिटेलिंग करतात. प्रत्येक गोष्ट चाचपडून पाहणे, सतत त्यावर विचार करणे, माहिती काढणे मगच ती गोष्ट ते मान्य करतात. असे लोक संशोधक होऊ शकतात. ही मंडळी रिस्क घ्यायला घाबरतात. खूप कमी वेळा एखाद्या गोष्टीची रिस्क घेतात. फायनान्स रिस्क तर टाळतात. हिशेब व्यवस्थित ठेवतात. टेजरर, फायनान्स, संशोधक, मिडिकल, प्रोजेक्ट मॅनेजर या क्षेत्रात जास्त यश प्राप्त करतात.
पॉइंटेड सिग्नेचर यामधील अक्षर ही टोकदार असतात. ही मंडळी कुशाग्र बुद्धीचे असतात. त्यांना एखादी गोष्ट त्यांच्या बुद्धीला पटत नाही तोपर्यंत ते विश्वास ठेवत नाहीत. लॉजिकली ते पटलं तरचं ते त्यावर विश्वास ठेवतात. यांच्या सिग्नेचरप्रमाणे यांची वाणीदेखील कडक आणि टोचणारी असते. ते नेहमी खरे आणि स्पष्ट बोलतात. कधीतरी त्यांच्या अशा बोलण्याने लोक दुखावतात. पण ते नेहमी स्टेट फॉरवर्ड राहणं पसंद करतात. पेहराव तसेच स्टायलिश राहण्यापेक्षा ते साधं राहणीमान ठेवतात. पण ते बुद्धीला मात्र जास्त प्राधान्य देतात. ते त्यांचं मुख्य शस्त्र असतं, असं याचे अभ्यासक सांगतात...!
- प्रगती जाधव पाटील