शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोयना नदीत पुन्हा मगरीचे दर्शन, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2023 17:57 IST

वन विभागाने ठोस पावले उचलून दुर्घटना घडण्यापूर्वी मगरीचा बंदोबस्त करावा, अशी मागणी

कोयनानगर : कोयनानगर परिसरातील कोयना नदी परिसरात मगरीचा वावर कायम असून मारूल गावच्या पैलतीरी कोयना नदी किनाऱ्यावर पुन्हा दुसऱ्यांदा सुमारे पाच फुटांची मगर दिसून आली आहे. मासे मारणाऱ्यांना ही मगर दिसून आली. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वन विभागाने ठोस पावले उचलून दुर्घटना घडण्यापूर्वी मगरीचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या महिन्यात कोयनानगर विभागातील कुसवडे गावानजीक कोयनानदीच्या पात्रालगत उघड्यावर पाच फुटांची मगर आढळून आली होती. स्थानिक शेतकरी जनावरे चारण्यासाठी नदीच्या परिसरात गेला होता. जनावरे चारत असताना त्याला नदीच्या काठावर मोठी मगर दिसून आली होती. याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वत्र फिरल्यानंतर कोयना वन्यजीव विभागाकडून संबंधित ग्रामपंचायतीला पत्र देऊन नदीपात्रात न जाण्याबाबत इतर सूचना केल्या होत्या.त्यानंतर पुन्हा शनिवारी कोयना विभागातील मारूल गावानजीक कोयना नदीपात्रात मासे मारण्यासाठी गेलेल्या मच्छीमारांना नदीकाठावर मगर दिसून आली. कोयना नदीपात्रालगत अनेक लोकवस्ती असून महिला कपडे धुण्यासाठी, शेतकरी जनावरे चारण्यासाठी व मुले आंघोळ करण्यासाठी नदीपात्रात सातत्याने जात असतात.

शेतकरीही शेतीपंप सुरू व बंद करण्यासाठी तसेच शेताला पाणी देण्यासाठी रात्री-अपरात्री जात असतात. तसेच नदीपात्रात मासेमारी करण्यासाठीदेखील येथील लोक दररोज जात असतात. त्यांच्या जीवाला या मगरीमुळे धोका निर्माण होऊ शकतो. कोयना नदीपात्रात सतत मगरीचा वावर असल्याचे निष्पन्न झाल्याने परिसरातील नागरिकांत प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाने याची गांभिर्याने दखल घेऊन मगरीचा बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांमधून केली जात आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरriverनदी