सिद्धिविनायक रथोत्सव उत्साहात
By Admin | Updated: January 23, 2015 23:35 IST2015-01-23T21:38:12+5:302015-01-23T23:35:06+5:30
दरम्यान, लाखो भाविकांनी दर्शन घेतले. रथावर १०० रुपयांपासून १ हजार रुपयांपर्यंतच्या माळा अपर्ण करण्यात आल्या होत्या.

सिद्धिविनायक रथोत्सव उत्साहात
वडूज : ‘बोला पुंडलिक हरी वरदेव, हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, विठोबा माउली तुकाराम, श्री सिद्धिविनायक की जय,’ या जयघोषात श्री सिद्धिविनायक रथोत्सवाला प्रारंभ होऊन श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाची भक्तिपूर्ण वातावरणात सांगता झाली. दरम्यान, लाखो भाविकांनी दर्शन घेतले. रथावर १०० रुपयांपासून १ हजार रुपयांपर्यंतच्या माळा अपर्ण करण्यात आल्या होत्या.शुक्रवारी सकाळी ७ ते ९ या दरम्यान शाम महाराज (आळंदी) यांच्या हस्ते पारायणाची सांगता होऊन सकाळी ९ ते ११ यावेळेत विजय महाराज (लोणी) यांचे काल्याचे कीर्तन झाले. सकाळी ११.३० ते १२. ३० यावेळेत श्री गणेश जन्माचे जयंत कुलकर्णी (भोसरे) यांचे कीर्तन झाल्यानंतर रथामध्ये ‘श्रीं’च्या मूर्ती ठेवण्यात आल्या, आणि रथोत्सवास प्रारंभ झाला. रथोत्सवादरम्यान यशवंतबाबा प्रतिष्ठान, मिनी टेम्पो चालक -मालक संघटना, सोमनाथ खुडे मित्र मंडळ, रणवीर जय शिवाजी मंडळ, जाणता राजा मित्र मंडळ, सुयोग मित्रमंडळ, भाग्योदय मित्र मंडळ, शिवक्रांती युवा मंडळ, हुतात्मा फ्रेंड सर्कल, हॉटेल आदित्य, हॉटेल संगम, व्यापारी मित्र मंडळ, शेतकरी मंडळ आदींनी रथोत्सवात सामील झालेल्या भक्तांसाठी व वारकरी यांच्यासाठी अल्पोपहाराचे वाटप केले. दरम्यान, दहीहंडी ही फोडण्यात आली.श्री सिद्धिविनायक रथोत्सव बाजार पटांगण मार्गे, आयलँड चौक, बसस्थानक, सुयोगनगर, शिवक्रांतीनगर मार्गे, हुतात्मा चौकातून मुख्य बजारपेठेतुन मुख्य ठिकाणी आला. यावेळी तालुक्यातील लाखो भाविकांनी श्री सिद्धिविनायक रथाचे दर्शन घेतले. (वार्ताहर)