शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
2
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
3
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना
4
गेल्या २४ तासांत जपानमध्ये भूकंपाचे धक्के, सर्वात मोठा भूकंप ६.८ रिश्टर स्केलचा; त्सुनामीचा इशारा जारी
5
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
6
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
7
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
8
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
9
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
10
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
11
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
12
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
13
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
14
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
15
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा
16
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
17
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
18
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
19
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
20
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप

मुलांमध्ये सिद्धिविनायक, तर मुलींमध्ये शिवाजी उदय अजिंक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:52 IST

कराड : टाळगाव (ता. कराड) येथे सातारा जिल्हा कबड्डी असोसिएशन व सनसनाटी स्पोर्ट्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या ...

कराड : टाळगाव (ता. कराड) येथे सातारा जिल्हा कबड्डी असोसिएशन व सनसनाटी स्पोर्ट्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या कुमार, कुमारी जिल्हा स्तरीय कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेत मुलांमध्ये सिद्धिविनायक मंडळ सातारा तर मुलींमध्ये शिवाजी उदय सातारा या संघाने अजिंक्यपद पटकावले. या कबड्डी स्पर्धेत उत्कृष्ट खेळ प्रदर्शन घडवणाऱ्या कबड्डी खेळाडूंची जळगाव येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. मुलांच्या गटात शिवछावा सवादे तर मुलींमध्ये शेरे कबड्डी संघ यांनी उपविजेतेपद पटकावले.

स्पर्धेचे उद्घाटन यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष इंद्रजित मोहिते यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेला रयत कारखान्याचे अध्यक्ष ॲड. उदयसिंह पाटील, पंचायत समिती सदस्य काशिनाथ कारंडे यांनी भेट देऊन उपस्थित खेळाडूंचे कौतुक केले. या स्पर्धा दोन दिवस सुरू होत्या पंच म्हणून उमेश साबळे, काका भिसे, विनोद पाटील, तानाजी देसाई, निवास पाटील, शशिकांत यादव, शांताराम सपकाळ, उमेश जाधव, अविनाश पाटील, रवींद्र सपकाळ, सुरेश पाटील यांनी काम पाहिले. विजेत्या संघांना सनसनाटी स्पोर्ट क्लबच्या कार्यकर्त्यांच्या हस्ते बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले.

रमेश थोरात यांनी खेळाचे सूत्रसंचालन केले. सुरेश पाटील यांनी स्वागत केले. अविनाश पाटील यांनी आभार मानले. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सनसनाटी स्पोर्ट्स क्लबच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

फोटो ओळी

टाळगाव. ता. कराड येथे जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेत मुलींच्या अंतिम विजेत्या संघाला बक्षीस वितरण करताना विनोद पाटील, शांताराम सपकाळ, सुरेश पाटील आदी.

24 pramod 03