श्याम मनोहरना ‘साहित्य’; भावेंना ‘समाजकार्य’

By Admin | Updated: December 16, 2014 23:49 IST2014-12-16T23:15:26+5:302014-12-16T23:49:11+5:30

महाराष्ट्र फौंडेशन : निखिल वागळेंना डॉ. दाभोलकर स्मृती पुरस्कार

Shyam Manoharana 'Literature'; Bhavrena 'social work' | श्याम मनोहरना ‘साहित्य’; भावेंना ‘समाजकार्य’

श्याम मनोहरना ‘साहित्य’; भावेंना ‘समाजकार्य’

सातारा : अमेरिकास्थित महाराष्ट्र फौंडेशनचे ‘साहित्य’ आणि ‘समाजकार्य’ पुरस्कार जाहीर झाले असून, ‘साहित्य जीवनगौरव’ पुरस्कार पुणे येथील श्याम मनोहर, तर ‘समाजकार्य’ पुरस्कार मुंबई येथील पुष्पा भावे यांना जाहीर झाला आहे. दोन लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. या पुरस्कारांसमवेत देण्यात येणाऱ्या अन्य पुरस्कारांचीही घोषणा झाली असून, याचे वितरण १० जानेवारी २०१५ रोजी पुणे येथील बालगंधर्व मंदिरात होणार आहेत.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील आणि राज्य सरचिटणीस डॉ. हमीद दाभोलकर यांनी मंगळवारी सातारा येथे पुरस्काराची घोषणा केली. दरम्यान, हे पुरस्कार अमेरिकेत स्थायिक मराठी व्यक्तींनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र फौंडेशनच्यावतीने देण्यात येत असले तरी त्याचे संयोजन पुणे येथील साधना ट्रस्ट करते.
महाराष्ट्र फौंडेशनतर्फे देण्यात येणारे साहित्य पुरस्कार पाच असून, ‘विशेष ग्रंथ पुरस्कार’ महाबळेश्वर सैल (गोवा) यांना ‘तांडव’ कादंबरीसाठी, ‘अपारंपरिक ग्रंथ पुरस्कार’ अरुण खोपकर (मुंबई) यांना ‘चित्रव्यूह’ व ‘चलत् चित्रव्यूह’ जोडपुस्तकारसाठी, ‘ललित ग्रंथ पुरस्कार’ किरण गुरव (कोल्हापूर) यांच्या ‘राखीव सावल्यांचा खेळ’ पुस्तकासाठी, तर ‘रा. शं. दातार नाट्यपुरस्कार’ हिमांशू स्मार्त (कोल्हापूर) यांना ‘जत्रेतलं जायंट व्हील’ या नाट्यलेखनासाठी जाहीर झाला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Shyam Manoharana 'Literature'; Bhavrena 'social work'