कंपनी व्यवस्थापकाला शिवीगाळ;

By Admin | Updated: February 28, 2016 00:37 IST2016-02-28T00:37:29+5:302016-02-28T00:37:29+5:30

१६ जणांवर गुन्हा

Shuffle company manager; | कंपनी व्यवस्थापकाला शिवीगाळ;

कंपनी व्यवस्थापकाला शिवीगाळ;

शिरवळ : खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडी गावच्या हद्दीत एका खासगी कंपनीच्या व्यवस्थापकाला शिवीगाळ व दमदाटी केल्याच्या आरोपावरून शिंदेवाडी येथील चार जणांसह इतर सुमारे १२ जणांविरुद्ध शिरवळ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतची शिरवळ पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शिंदेवाडी याठिकाणी एका खासगी कंपनीचे बांधकाम सुरू आहे. बांधकाम सुरू असताना त्याठिकाणी शिंदेवाडी येथील मयुर सोनावणे, तुकाराम सोनावणे हे आले. ‘याठिकाणी जागा आमची आहे. येथे खांब लावायचे नाही, जर खांब लावले तर जो कुणी पुढे असेल त्याचे हात-पाय तोडून टाकेन,’ अशी दमदाटी त्यांनी केली. त्यामुळे कंपनीमधील अधिकारी काम थांबवून निघून गेले. दरम्यान, यानंतर पुन्हा मयुर सोनावणे, तुकाराम सोनावणे, विलास सोनावणे, प्रसाद सोनावणे व इतर दहा-बारा जणांनी कंपनीमध्ये जबरदस्तीने घुसत व्यवस्थापक गणेश जाधव यांना काम थांबविण्याचे सांगून शिवीगाळ, दमदाटी केली. या आरोपावरून मयुर सोनावणे, तुकाराम सोनावणे यांच्यासह सुमारे १६ जणांविरुद्ध शिरवळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 

Web Title: Shuffle company manager;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.