श्रिया सामाजिक संस्था धावली गरजूंच्या मदतीला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:41 IST2021-05-06T04:41:18+5:302021-05-06T04:41:18+5:30

संस्थेच्या अध्यक्षा प्रिया आलेकरी यांनी गरीब, गरजू, वृद्ध, निराधार अशा लोकांना स्वतः पुढाकार घेऊन ही मदत केली आहे. ...

Shriya runs social organization to help the needy! | श्रिया सामाजिक संस्था धावली गरजूंच्या मदतीला!

श्रिया सामाजिक संस्था धावली गरजूंच्या मदतीला!

संस्थेच्या अध्यक्षा प्रिया आलेकरी यांनी गरीब, गरजू, वृद्ध, निराधार अशा लोकांना स्वतः पुढाकार घेऊन ही मदत केली आहे. त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांनी ही मदत दिली आहे. त्याबरोबरच कोरोनाचा प्रसार टाळला जावा म्हणून अनेक गरजूंना मोफत मास्कचे वाटप केले आहे. या कामात त्यांना विद्या मोरे, सुनीता भोसले यांची मदत लाभली आहे.

प्रिया आलेकरी म्हणाल्या, आज कोरोनाचे महामारी संकट सर्वांसमोर उभे आहे. अशा वेळी सामाजिक बांधीलकी प्रत्येकाने जपली पाहिजे. त्याच भावनेतून आम्ही संस्थेच्या वतीने हा छोटासा उपक्रम राबवला आहे. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रबोधनाचे काम सुरूच आहे.

Web Title: Shriya runs social organization to help the needy!