‘श्रीकृष्ण’ने दिले साताऱ्याला नामवंत क्रीडापटू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:08 IST2021-02-05T09:08:25+5:302021-02-05T09:08:25+5:30
सातारा : ‘शंभर वर्षे पूर्ण करणाऱ्या साताऱ्यातील श्रीकृष्ण क्रीडा मंडळाने क्रीडा क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. या मंडळाने ...

‘श्रीकृष्ण’ने दिले साताऱ्याला नामवंत क्रीडापटू
सातारा : ‘शंभर वर्षे पूर्ण करणाऱ्या साताऱ्यातील श्रीकृष्ण क्रीडा मंडळाने क्रीडा क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. या मंडळाने अनेक नामवंत क्रीडापटू साताऱ्याला दिले आहेत. मंडळाची ही परंपरा याहीपुढे अखंड सुरू राहील’, असा विश्वास नगराध्यक्षा माधवी कदम यांनी व्यक्त केला.
श्रीकृष्ण क्रीडा मंडळाच्या शताब्दी वर्षपूर्तीनिमित्त उभारण्यात आलेल्या नवीन व्यायामशाळेचे उद्घाटन नगराध्यक्षांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमास बांधकाम सभापती सिद्धी पवार, पाणीपुरवठा सभापती सीता हादगे, महिला व बालकल्याण सभापती रजनी जेधे, आरोग्य सभापती अनिता घोरपडे, बाळासाहेब गोसावी, वसंत शेठ जोशी, काकासाहेब धुमाळ, संग्राम बर्गे, श्रीकृष्ण मंडळाचे अध्यक्ष अॅड. आबा पवार, उपाध्यक्ष तथा नगरसेवक किशोर शिंदे, मंडळाचे सचिव संजय शिंदे, खजिनदार शेखर कडव, सचिन गोसावी आदी उपस्थित होते.
नगराध्यक्ष माधवी कदम पुढे म्हणाल्या, ‘सार्वजनिक क्षेत्रातील क्रीडा मंडळाने शंभर वर्षे पूर्ण करावे हीच मोठी बाब आहे. या मंडळाने अनेक नामवंत क्रीडापटू साताऱ्याला दिले आहेत. महिलांसाठी व्यायामशाळा सुरू करणारी श्रीकृष्ण क्रीडा मंडळ ही पहिली संस्था आहे. मंडळाने उभारलेल्या अद्ययावत व्यायामशाळेचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
मंडळाचे अध्यक्ष आबा पवार यांनी मंडळाच्या कामकाजाचा आढावा घेतला. संजय शिंदे यांनी प्रास्ताविक केले. शेखर कडव यांनी आभार मानले.
फोटो : ०२ श्रीकृष्ण क्रीडा मंडळ
साताऱ्यातील श्रीकृष्ण क्रीडा मंडळाच्या नूतन व्यायामशाळेचे उद्घाटन नगराध्यक्षा माधवी कदम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सिद्धी पवार, किशोर शिंदे उपस्थित होते.