महानुभाव आश्रमात आज श्रीचक्रधर अवतार दिन महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:47 IST2021-09-08T04:47:16+5:302021-09-08T04:47:16+5:30

सातारा : महानुभाव पंथाचे प्रवर्तक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या अवतारास यंदा आठशे वर्षे पूर्ण होत आहेत. या ...

Shrichakradhar Avatar Day Festival today at Mahanubhav Ashram | महानुभाव आश्रमात आज श्रीचक्रधर अवतार दिन महोत्सव

महानुभाव आश्रमात आज श्रीचक्रधर अवतार दिन महोत्सव

सातारा : महानुभाव पंथाचे प्रवर्तक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या अवतारास यंदा आठशे वर्षे पूर्ण होत आहेत. या अष्टशताब्दी वर्षानिमित्त करंजे येथील महानुभाव आश्रमात बुधवार, दि. ८ रोजी श्री चक्रधर अवतार दिन महोत्सव साजरा करण्यात येणार आहे.

यानिमित्त आश्रमात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, मंगळवारी अखंड लिळाचरित्र पठणाचा प्रारंभ करण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांसाठी सर्व कार्यक्रम ऑनलाईन प्रक्षेपित करण्यात येणार असल्याचे आश्रमाच्या संचालकांनी सांगितले.

दरम्यान, करंजोशी-नागठाणे येथे ब्रम्हविद्या प्रतिष्ठानच्यावतीने सायंकाळी सात वाजता सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू अवतार, परमेश्वर कृपा शक्ती अवतरली महीवर या विषयावर ऑनलाईन प्रक्षेपणाद्वारे व्याख्यान आयोजित करण्यात आल्याची माहिती रामचंद्र पन्हाळकर यांनी दिली.

Web Title: Shrichakradhar Avatar Day Festival today at Mahanubhav Ashram