गोंदवलेत वाहनातून ‘श्रीं’च्या पादुका रामभेटीला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:37 IST2021-01-03T04:37:37+5:302021-01-03T04:37:37+5:30

म्हसवड : ना सडा-रांगोळ्या... ना सनई चौघडे... पताकाधारी अन‌् टाळकऱ्यांच्या अभंगांचा आलापही नाही; परंतु मोठ्या दिमाखात ‘श्रीं’च्या पादुका ...

To 'Shree's' Paduka Rambheti from a tattooed vehicle! | गोंदवलेत वाहनातून ‘श्रीं’च्या पादुका रामभेटीला!

गोंदवलेत वाहनातून ‘श्रीं’च्या पादुका रामभेटीला!

म्हसवड : ना सडा-रांगोळ्या... ना सनई चौघडे... पताकाधारी अन‌् टाळकऱ्यांच्या अभंगांचा आलापही नाही; परंतु मोठ्या दिमाखात ‘श्रीं’च्या पादुका वाहनातून ग्रामप्रदक्षिणेसाठी निघाल्या अन‌् श्रीरामभेटीच्या सोहळ्याने भाविकही सुखावले.

श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त पालखीची ग्रामप्रदक्षिणा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द केली आहे. यावेळी वाहनाच्या माध्यमातून श्री महाराज हे लाडक्या ‘बत्ताशा’वर स्वार होत असल्याची भाविकांची भावना आहे. श्रीराम भेटीनंतर समाधीमंदिरात सेवेकऱ्यांच्या उपस्थितीत पालखी सोहळा पार पाडण्यात येत आहे. श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचा पुण्यतिथी महोत्सव गोंदवल्यात गुरुवार (दि. ३१) पासून सुरू झाला आहे. शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून समाधीमंदिर समितीने काळजी घेतली आहे. मंदिर सेवेकरी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत या सोहळ्याची परंपरा जपली जात आहे.

भाविकांची गर्दी टाळण्यासाठी महोत्सवाच्या काळातील श्रींच्या पालखीची ग्रामप्रदक्षिणा रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे मंदिर समितीच्या वाहनातूनच श्रींच्या पादुका श्रीराम भेटीसाठी नेण्यात येत आहेत. श्रींचा ‘बत्ताशा’ नावाचा लाडका घोडा होता. त्यामुळे मंदिर समितीच्या सर्व वाहनांना बत्ताशासमान मानले जाते. श्रींच्या पादुका या बत्ताशाच्या माध्यमातून यंदा ग्रामप्रदक्षिणा करीत आहेत.

रोज सकाळी दहाच्या सुमारास समाधीमंदिरात आरती झाल्यानंतर पादुका ग्रामप्रदक्षिणेसाठी काढण्यात येत आहेत. गावातील थोरले व धाकटे श्रीराम मंदिर, श्री दत्तमंदिरात त्या आणण्यात येतात. ग्रामप्रदक्षिणेनंतर समाधीमंदिरात सेवेकऱ्यांच्या उपस्थितीत पालखीतून श्रींच्या पादुका व प्रतिमेच्या मंदिर प्रदक्षिणा पूर्ण केल्या जात आहेत. ८ जानेवारीला या महोत्सवाची सांगता होणार आहे. या काळात रोज सकाळी श्रींच्या पादुका श्रीराम भेटीसाठी नेण्यात येतील. दरम्यान, ग्रामप्रदक्षिणेवेळी दहिवडी पोलीस ठाण्याकडून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

फोटो

०२गोंदवले-पालखी

गोंदवले येथे ब्रह्मचैतन्य महाराजांच्या पादुकांची वाहनातून ग्रामप्रदक्षिणा करण्यात आली. मंदिर आल्यानंतर पालखी आत नेण्यात येत होती. (छाया : सचिन मंगरुळे)

Web Title: To 'Shree's' Paduka Rambheti from a tattooed vehicle!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.