सातारा-कऱ्हाड ‘सखीं’साठी मार्लेश्वरात ‘श्रावण सहल’
By Admin | Updated: July 29, 2014 23:03 IST2014-07-29T21:23:21+5:302014-07-29T23:03:04+5:30
९ आॅगस्ट : निसर्गरम्य कोकणाचा आनंद घेण्याची संधी

सातारा-कऱ्हाड ‘सखीं’साठी मार्लेश्वरात ‘श्रावण सहल’
सातारा : श्रावण सुरू झालाय. आषाढातली पावसाची झड संपलीय. म्हणूनच श्रावणातल्या दुसऱ्या शनिवारी म्हणजेच ९ आॅगस्टला कोकणातील मार्लेश्वर येथे सातारा आणि कराडच्या सखींसाठी ‘लोकमत’ सखी मंचने एकदिवसीय श्रावण सहल आयोजित केलीय.
श्रावण सुरू झाला की, प्रत्येकालाच वेध लागतात ते सौंदर्यस्थळांना भेटी देण्याचे. म्हणूनच सखी वाट पाहत असतात ‘लोकमत सखी मंच’च्या श्रावण सहलीची. तर सखींसाठी या वर्षीची प्रतीक्षा आता संपलीय.९ आॅगस्टला कोकणातील मार्लेश्वर येथे सातारा आणि कराडच्या सखींसाठी ‘लोकमत’ सखी मंचने एकदिवसीय श्रावण सहल आयोजित केली आहे. या श्रावणात हिरव्यागर्द वनश्रीने नटलेल्या कोकणात निसर्गाबरोबरच श्रावणमासानिमित्त शंभुमहादेवाचं दर्शनही होेणार आहे. या सहलीसाठी फक्त सखी मंच सदस्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे. सहलीसाठी ७०० रुपये सहल शुल्क असून यामध्ये सकाळचा चहा-नाष्टा, रात्रीचे जेवण, सायंकाळचा चहा आणि प्रवास यांचा खर्च समाविष्ट आहे. सखींनी दुपारचे जेवण सोबत घ्यायचे आहे. पिण्याचे पाणी आणि आवश्यक असेल तर कोरडा खाऊ, रेनकोट, छत्री, स्वेटर साहित्य घेऊन यायचे आहे. सहल शुल्क ‘लोकमत’ कार्यालय, गुरुअलंकार कॉम्लेक्स, शेटे चौक, गुरुवार पेठ, सातारा आणि लोकमत कार्यालय, पाटील हेरिटेज, दत्ता चौक, कराड येथे ५ आॅगस्टपर्यंत सकाळी ११ ते ६ या वेळत स्वीकारले जाईल.मर्यादित प्रवेश असल्यामुळे सहल शुल्क भरल्यानंतरच सहलीमध्ये प्रवेश निश्चित होईल.सखी मंच ओळखपत्र आवश्यक. माहितीसाठी ‘लोकमत’ कार्यालय अथवा ९९२२२४९९१४, ९७६२५२७१०९ या क्रमांकावर संपर्क साधावा. (प्रतिनिधी)