शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीला भावलं श्रमदान- भांडवली : पुरंदरे, इंदापूरच्या ग्रामस्थांकडूनही जलसंधारणाची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 00:24 IST

भांडवली, ता. माण येथील ग्रामस्थांनी वॉटरकप स्पर्धेदरम्यान, श्रमदानाच्या माध्यमातून केलेल्या जलसंधारणाच्या कामाची पाहणी बारामती येथील अ‍ॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदा पवार यांनी भेट दिली.

म्हसवड : भांडवली, ता. माण येथील ग्रामस्थांनी वॉटरकप स्पर्धेदरम्यान, श्रमदानाच्या माध्यमातून केलेल्या जलसंधारणाच्या कामाची पाहणी बारामती येथील अ‍ॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदा पवार यांनी भेट दिली. यावेळी इंदापूर, पुरंदर येथील दुष्काळी ३३ गावांतील दीडशे ग्रामस्थांना भांडवलीच्या शिवाराची सैर घडवत दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी कशी कामे करून दुष्काळावर मात करता येईल, याची पाहणी केली.

यावेळी माजी जलसंधारण सचिव प्रभाकर देशमुख, पुणे जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार, माणचे सभापती रमेश पाटोळे, पंचायत समिती सदस्य विजयकुमार मगर, म्हसवडच्या उपनगराध्यक्ष स्नेहल सूर्यवंशी, अजित पवार, दादासाहेब चोपडे, रमेश शिंदे, प्रशांत वीरकर व मान्यवर उपस्थित होते.

भांडवली, ता. माण येथील ग्रामस्थांनी श्रमदानाच्या माध्यमातून सत्यमेव जयते वाटरकप स्पर्धेच्या ४५ दिवसांच्या कालावधीत उपसरपंच सुनील सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली गावांनी एकजुटीच्या बळावर अतिशय शास्त्रशुद्ध, दर्जेदार व आखीव-रेखीव जलसंधारणाची कामे केली आहेत. या गावातील जलसंधारणाची कामे दिखाऊपेक्षा टिकाऊ झाल्याची पाहून बारामती, इंदापूर व पुरंदर येथील ग्रामस्थांसह मंडळी आश्चर्यचकित झाली. जोरदार पाऊस पडूनसुद्धा चर, खोल सलग समतल चर, अनघड दगडी बांध, बांध-बंदिस्ती, माती नाला बांध यातील एकही संरचना फुटली नव्हती.गावाची ओळख पाणीदार...गांवची दुष्काळी ओळख पुसून आपले गाव पाणीदार होऊन गावची ओळख बागायती गाव होण्यासाठी रात्रंदिवस कष्ट घेतलेले उपसरपंच सुनील सूर्यवंशी व त्यांच्या पत्नी कविता सूर्यवंशी यांनी दिलेले योगदान अमूल्य असून, या पद्धतीने प्रत्येकाने काम केले तर गावागावामध्ये अमूलाग्र बदल होईल. अशी भावना सर्वांनी व्यक्त केली. 

विशेष म्हणजे मागील पंधरा दिवसांत दोनदा अतिवृष्टी होऊनसुद्धा येथील जलसंधारणाची एकही रचना तुटली, फुटली नाही. यावरून लक्षात येते की काम किती शास्त्रशुद्ध झाले आहे. जलसंधारणाची कामे अनेक ठिकाणी झाली आहेत; पण या पद्धतीचे उत्कृष्ट काम मी कुठेही पाहिले नाही.- सुनंदा पवार, विश्वस्त, अ‍ॅग्रीकल्चरल ट्रस्ट बारामती.करायचे म्हणून काम न करता मनापासून केलेले जलसंधारणाचे काम पाहायचे असेल तर एकवेळ भांडवलीला अवश्य भेट द्यावी.- रोहित पवार, जिल्हा परिषद सदस्य पुणेबारामती, इंदापूर व पुरंदरच्या ग्रामस्थांनी पाहणी करून केलेले कौतुक ही भांडवलीकरांच्या कामाची पोचपावती आहे.- प्रभाकर देशमुख, माजी विभागीय आयुक्त. 

 

टॅग्स :Water Cup Competitionवॉटर कप स्पर्धाSatara areaसातारा परिसर