गावाच्या विकासासाठी एकजूट दाखवा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:45 IST2021-09-17T04:45:40+5:302021-09-17T04:45:40+5:30
तळमावले : ‘गटतट विसरून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामस्थांनी एकजूट दाखवावी. ग्रामस्थांच्या एकीतून गावाचा कायापालट होऊ शकतो,’ असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे ...

गावाच्या विकासासाठी एकजूट दाखवा!
तळमावले : ‘गटतट विसरून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामस्थांनी एकजूट दाखवावी. ग्रामस्थांच्या एकीतून गावाचा कायापालट होऊ शकतो,’ असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे नेते सारंग पाटील यांनी केले.
कुंभारगाव, ता. पाटण विभागात खासदार श्रीनिवास पाटील यांच्या फंडातून मंजूर झालेल्या विकासकामांच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी शिक्षण सभापती संजय देसाई, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राजाभाऊ काळे, शंकरराव चव्हाण, रघुनाथ चव्हाण, महादेव वरेकर, नवभारत पतसंस्थेचे अध्यक्ष सौरभ देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती.
कुंभारगाव विभागातील कळंत्रेवाडी व बामणवाडी येथील रस्त्यांसाठी खासदार श्रीनिवास पाटील यांच्या फंडातून सुमारे पन्नास लाख रुपयांची मंजुरी मिळाली आहे. या दोन्ही रस्त्यांचे भूमिपूजन सारंग पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. दादासाहेब नांगरे-पाटील, मारुती मोळावडे, बांधकाम विभागाचे कांबळे, ग्रामपंचायत सदस्या रेखाताई कळंत्रे, नंदकुमार खटावकर, रघुनाथ जाधव यांची उपस्थिती होती. नामेदव खटावकर, महादेव वरेकर यांनी मनोगत व्यक्त केले. सचिन पुजारी यांनी सूत्रसंचालन केले. सौरभ देसाई यांनी आभार मानले.
फोटो : १६केआरडी०१
कॅप्शन : कुंभारगाव, ता. पाटण विभागात राष्ट्रवादीचे नेते सारंग पाटील यांच्या हस्ते रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.