यात्रा बैठकीत दांडी मारणाऱ्या अधिकाऱ्यांना ‘कारणे दाखवा’

By Admin | Updated: November 29, 2015 00:53 IST2015-11-29T00:53:07+5:302015-11-29T00:53:20+5:30

म्हसवड : जिल्हाधिकाऱ्यांपुढे खुलासा करण्याच्या नोटिसा

Show reasons to the officers who sticks to the meeting | यात्रा बैठकीत दांडी मारणाऱ्या अधिकाऱ्यांना ‘कारणे दाखवा’

यात्रा बैठकीत दांडी मारणाऱ्या अधिकाऱ्यांना ‘कारणे दाखवा’

म्हसवड : येथील श्री सिद्धनाथ यात्रेसंबंधी शुक्रवारी प्रशासनाने यात्रा कालावधीत करावयाच्या नियोजनाबाबत विविध विभागांच्या तालुकास्तरीय अधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, या बैठकीस दांडी मारणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारणे दाखवा नोटीस पाठवून त्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्यापुढे खुलासा करावयाच्या नोटिसा देण्यात येणार असल्याचे प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांनी बैठकीत स्पष्ट केले.
या यात्रे संदर्भात विविध वभागांच्या बारा अधिकाऱ्यांना आमंत्रित करण्यात आले होते. या बारा अधिकाऱ्यांपैकी तीनच अधिकारी उपस्थित होते. तर सहा विभागांच्या अधिकाऱ्यांनी आपले प्रतिनिधी पाठवले होते. तर तीन विभागांचे अधिकारी या प्रतिनिधी कोणीच उपस्थित न राहिल्याने तालुक्यातील अधिकाऱ्यांना श्री सिद्धनाथ यात्रेचे किती गांभीर्य आहे. यावरून स्पष्ट होते.
ग्रामदैवत श्री सिद्धनाथाचा रथोत्सव येत्या १२ डिसेंबरला आहे. या यात्रेसाठी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र या राज्यांतून किमान चार ते पाच लाख भाविक येत असतात. भाविकांना सुरक्षा, आरोग्य सुविधा, वाहनतळव्यवस्था वाहतुकीची कोंडी मंदिर व रथ मिरवणूक मार्गावरील भाविकांची गर्दी त्यावर नियंत्रण, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था या पार्श्वभूमीवर ते पुढील बैठकीत आम्ही काय केले हे काय सांगणार? तर या बैठकीचे शक्रवारी आमदार जयकुमार गोरे, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, तहसीलदार सुरेखा माने, उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत काळे, नगराध्यक्ष विजय धट, रथाचे मानकरी अजित राजेमाने, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष लक्ष्मण फुसके (गुरव) यांच्या उपस्थित बैठकीत नियोजित केले होते. परंतु, संबंधित विभागाचे अनेक उपस्थित असणारे अधिकारी बैठकीच्या वेळेत उपस्थित नव्हते. त्यामुळे प्रमुखमंडळींना नाराजी व्यक्त केली. त्यामुळे या बैठकीस दांडी मारणाऱ्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस पाठविण्यात येणार असल्याची माहिती प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांनी दिली.
बैठकीस शहरातील अनेक प्रमुख राजकीय कार्यकर्त्यांना नियोजन करण्यात आल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. तर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थित होणाऱ्या बैठकीस तरी अशी चूक प्रशासनाने करू नये, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Show reasons to the officers who sticks to the meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.