शहरं
Join us  
Trending Stories
1
नेते गेले बांधावर! वेदनांच्या महापुरावर आश्वासनांची फुंकर; कुणी हात जोडले, कुणी व्यथा मांडल्या
2
'आता ती वेळ आली आहे, राज्यातील शेतकऱ्यांना...'; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागणी काय?
3
बहिणीसाठी रक्षक नाही, भक्षक ठरले भाऊ; आई-वडिलांनीही पाठ फिरवली, पण होणाऱ्या नवऱ्याने साथ दिली अन्..
4
Post Office च्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹४ लाख, मिळेल ₹१,७९,६३१ चं फिक्स व्याज, पटापट चेक करा डिटेल्स
5
लडाखमध्ये Gen Z क्रांती, स्वतंत्र राज्यासाठी पेटून उठले; रस्त्यावर उतरली तरूणाई, मागण्या काय?
6
Swami Chaitanyananda Saraswati: वासनांध बाबा गरीब मुलींना हेरायचा, खोलीत बोलवून...; ५० मोबाईलचा तपास, ५ राज्यात धाडी  
7
लडाख हिंसाचारात चार जणांचा मृत्यू, ७० जण जखमी, कर्फ्यू लागू, इंटरनेटवर बंदी; भाजपचा काँग्रेसवर कट रचल्याचा आरोप
8
‘हिंडेनबर्ग’ने भारतीयांच्या स्वप्नांवरच घातला घाला; गौतम अदानींचं भागधारकांना पत्र, म्हणाले...
9
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
10
आजचे राशीभविष्य- २५ सप्टेंबर २०२५, प्रगतीच्या संधी चालून येतील, आर्थिक लाभ होईल
11
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
12
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
13
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
14
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
15
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
16
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
17
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
"माझ्या बेडरुममध्ये ये, तुला परदेशात फिरायला घेऊन जातो"; स्वयंघोषित बाबानं केला १७ मुलींचा छळ
19
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
20
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे

शहरात जागा दाखवा... स्वच्छतागृह बांधू !

By admin | Updated: July 9, 2015 22:51 IST

शिवेंद्रसिंंहराजे : वार्ड कमिटी बैठकीत शहरातील विविध प्रश्नांवर चर्चा

सातारा : शहराच्या सर्वांगीण विकासासाठी स्थापन झालेल्या वार्ड कमिटीमुळे नागरिकांच्या समस्या सुटण्यास मदत होत आहे. नागरिक थेट आपल्या समस्या अधिकाऱ्यांसमोर मांडत आहेत. यामुळे शहराच्या विकासाला खऱ्या अर्थाने गती मिळाली असून वार्ड कमिटीमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आ. शिवेंद्रसिंंहराजे यांनी केले. तसेच, यावेळी तुम्ही जागा दाखवा, तिथे स्वच्छतागृह करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.आ. शिवेंद्रसिंंहराजे भोसले यांनी शहराच्या विकासासाठी स्वयंसेवी नागरिकांची वार्डनिहाय कमिटी तयार केली आहे. शहरातील ३९ वार्डांसाठी स्थापन झालेल्या कमिटीची टप्प्याटप्प्याने बैठक घेतली जात असून आ. शिवेंद्रसिंंहराजे यांच्या अध्यक्षतेखाली ८ ते १५ वार्डासाठी स्थापन झालेल्या कमिटीची पहिली बैठक उत्साहात झाली. यावेळी रामदास बल्लाळ, हेमंत कासार यांच्यासह पालिकेचे नगर अभियंता दिलीप चिद्रे, आरोग्य निरीक्षक शिवदास साखरे, दत्तात्रय रणदिवे, भागनिरीक्षक सतीश साखरे, अभियंता प्रदीप साबळे, सुधीर चव्हाण, एस. एस. भावी, संदीप सावंत तसेच वार्ड कमिटी सदस्य उपस्थित होते. वार्ड कमिटी सदस्यांनी आपल्या भागातील समस्या मांडल्या. त्या सोडविण्यासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी प्रशासनाला सूचना केल्या आहेत. रात्रीच्या वेळी सर्व ठिकाणी पथदिवे सुरु राहतील याची दक्षता घेण्याची सूचनाही केली. स्वच्छतागृहे बांधण्याची मागणी सदस्यांनी केली. त्यावर तुम्ही जागा दाखवा, तिथे स्वच्छतागृह करण्यात येईल. बुधवार पेठेत हौदांची स्वच्छता करुन गणेशोत्सवात मूर्ती विसर्जनासाठी या हौदांचा वापर करावा, असे त्यांनी प्रशासनास सांगितले. कामाठीपुरा, कोल्हाटी वस्ती, वैदू वस्ती याठिकाणच्या समस्या मांडल्या. या परिसरात झोपडपट्टी सुधार योजना राबवण्याची मागणी करण्यात आली. मात्र ग्रीन झोन असून झोन उठल्याशिवाय घरकुल बांधकाम करता येत नसल्याचे शिवेंद्रसिंहराजे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)गोडोली तळ्यामुळे पावसाळ्यात हानीगोडोली तलावाचे बांधकाम झाल्याने पावसाळ्यात अजिंक्यताऱ्यावरुन खाली येणाऱ्या पाण्याचा निचरा होत नसून यामुळे गोडोलीत मोठी हानी होत असल्याचा मुद्दा मोरे यांनी मांडला. मात्र हा भाग त्रिशंकू असून पालिकेच्या हद्दीत नाही. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून काय तोडगा काढता येतो का ते पाहू, असे आ. शिवेंद्रसिंंहराजे म्हणाले.भागनिरीक्षकांनी जबाबदारीने काम करावेपंचायत समितीसमोर नेपाळी व्यावसायिकांना जागा देण्यात आली असून त्यांनी याठिकाणी अनधिकृत बांधकाम केल्याचे व्यंकटराव मोरे यांनी सांगितले. याबाबत भागनिरीक्षक आणि आरोग्य निरीक्षक यांनी दररोज आपल्या भागात जाऊन पाहणी केली पाहिजे. भागनिरीक्षक जागृत असतील तर चुकीच्या कामांना पाठबळ मिळणार नाही, असे आ. शिवेंद्रसिंंहराजे यांनी स्पष्ट केले.