धक्कादायक निर्णयांनी गाजला शनिवार

By Admin | Updated: September 28, 2014 00:33 IST2014-09-28T00:30:08+5:302014-09-28T00:33:55+5:30

मदन भोसले काँग्रेसमध्येच : माणमध्ये शिवसेनेकडून रणजितसिंह; भाजपचा कोरेगाव स्वाभिमानीला

Shocking decisions have been made Saturday | धक्कादायक निर्णयांनी गाजला शनिवार

धक्कादायक निर्णयांनी गाजला शनिवार

सातारा : जिल्ह्याच्या राजकारणात शनिवारचा दिवस चांगलाच गाजला. अनेक उमेदवारांची नावे अचानकपणे पुढे आली आणि अनेकांची धावपळ उडाली. दुसरीकडे ‘कऱ्हाड दक्षिण’मध्ये राष्ट्रवादीने विलासराव पाटील-उंडाळकरांना पुरस्कृत करणार नाही, असे सांगत राजेंद्र यादव यांना उमेदवारी दिली.
राष्ट्रवादीने काही ठिकाणच्या उमेदवारांची नावे पंधरा दिवसांपूर्वीच निश्चित केली होती. ‘कऱ्हाड दक्षिण’ आणि ‘फलटण’ला विलंब झाला.
कऱ्हाड दक्षिण आणि माणमध्ये काँग्रेसचे उमेदवार निश्चित होते. मात्र, उर्वरित ठिकाणी करण्यासाठी शनिवार उजाडला.
शिवसेनेलाही उमेदवार आयात करावे लागले. ‘सातारा-जावळी’तून मुंबईवासी असलेले अन् मूळचे जावळीकर दगडू सकपाळ तर ‘कऱ्हाड उत्तर’मधून मूळचे पाटण तालुक्यातील अन् आता सातारावासी असलेल्या नरेंद्र पाटील यांना ‘मातोश्री’वरून लढण्याचे आदेश आले. विशेष म्हणजे, दगडू सकपाळ यांच्या मिरवणुकीची तयारी करत असतानाच नरेंद्र पाटील यांना ‘कऱ्हाड उत्तर’मधून अर्ज भरण्याचा निरोप आला.
त्यानुसार त्यांनी अर्ज भरला. (प्रतिनिधी)
४वाई : मदन भोसले भाजप की अन्य पक्षाचे उमेदवार असणार याची चर्चा अनेक दिवस सुरू होती. मात्र, शनिवारी त्याला पूर्णविराम मिळाला. त्यांनी काँग्रेसकडून अर्ज दाखल केला.
४कऱ्हाड दक्षिण : विलासराव पाटील-उंडाळकर यांनी अखेर अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. जिल्हा बँकेत झालेल्या बैठकीनंतर राष्ट्रवादीकडून अनपेक्षितपणे राजेंद्र यादव यांचे नाव पुढे आले.
४माण-खटाव : शिवसेनेकडून शनिवारी मध्यरात्री रणजितसिंह देशमुख यांचे नाव जाहीर झाले.
४फलटण : स्वाभिमानीकडून तयारी करणाऱ्या दिगंबर आगवणे यांना काँग्रेसची तर शिवसेनेकडून डॉ. नंदकुमार तासगावकर यांना उमेदवारी देण्यात आली. आगवणेंच्या निर्णयामुळे स्वाभिमानीने गतवेळचे काँग्रेस बंडखोर पोपटराव काकडे यांना उमेदवारी दिली.
४पाटण : हिंदुराव पाटील यांनी येथून राहुल चव्हाण यांचे नाव सुचविले होते; मात्र काँग्रेनसे हिंदुराव पाटलांनाच उमेदवारी दिली.
४कोरेगाव : शेवटच्या क्षणी कोरेगाव मतदारसंघ भाजपऐवजी स्वाभिमानीला बहाल करण्यात आला. येथे संजय भगत यांना उमेदवारी मिळाली. दिवंगत शंकरराव जगताप यांची कन्या सुनीता जगताप तसेच शिवाजीराव महाडिक यांनी अर्ज दाखल केला. शिवसेनेकडून हणमंतराव चवरे उमेदवार आहेत.

Web Title: Shocking decisions have been made Saturday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.