लोकमत न्यूज नेटवर्कसातारा/फलटण :फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या एका मुलीचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी संबंधित मुलीने ओळखीच्या व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ९ एप्रिल २०२६ रोजी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. संबंधित १८ वर्षांची मुलगी उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथे उपचार घेत असताना तिच्या वॉर्डमध्ये तिच्या ओळखीचा अभिषेक अशोक सोडमिसे (रा. सोमंथळी, ता. फलटण, जि. सातारा) हा आला. त्यावेळी तिची आई डबा आणण्यासाठी बाहेर गेली होती.
संशयिताने महिलेची चौकशी करत तिच्या बेडवर बसत तिच्याशी बोलणे सुरू केले. त्यानंतर त्याने महिलेच्या गळ्याला हात लावून विनयभंग केल्याचा आरोप आहे. तसेच “तू सिंगल आहेस, आनंदी राहायला हवे” असे म्हणत गैरवर्तन केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. या प्रकारामुळे महिलेच्या मनात लज्जा व भीती निर्माण झाली असून तिने संबंधिताविरुद्ध कारवाईची मागणी केली आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.
Web Summary : A woman receiving treatment at Phaltan hospital was allegedly molested. The incident occurred when a known individual visited her ward while her mother was away. The accused allegedly touched her inappropriately and made offensive remarks, leading to a police complaint and investigation.
Web Summary : फलटण के अस्पताल में इलाज करा रही एक युवती के साथ कथित तौर पर छेड़छाड़ की गई। घटना तब हुई जब एक परिचित व्यक्ति वार्ड में उससे मिलने आया जबकि उसकी माँ बाहर थी। आरोपी ने कथित तौर पर उसे गलत तरीके से छुआ और आपत्तिजनक टिप्पणी की, जिसके बाद पुलिस में शिकायत दर्ज कराई गई और जांच शुरू की गई।