शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2019 23:31 IST2019-01-27T23:31:22+5:302019-01-27T23:31:26+5:30
सातारा : सातारा, माण, कोरेगाव मतदार संघातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे कारखानदारांनी दिले नाहीत, असा आरोप करत युवा सेनेचे ...

शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न
सातारा : सातारा, माण, कोरेगाव मतदार संघातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे कारखानदारांनी दिले नाहीत, असा आरोप करत युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष रणजितसिंह भोसले यांच्यासह कार्यकर्त्यांनी २६ जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला.
हातात रॉकेलचे कॅन घेऊन आलेल्या कार्यकर्त्यांनी अंगावर रॉकेल ओतले. परंतु पोलिसांनी तत्काळ त्यांच्या हातातून कॅन हिसकावून घेतले. त्यानंतर पोलीस व्हॅनमधून त्यांना पोलीस ठाण्यात आणले. यावेळी रणजितसिंह भोसले म्हणाले, ‘कारखानदारांनी गेल्या वर्षीची जाहीर रक्कम एका शेतकºयाला जास्त दर व एका शेतकºयाला कमी दर हे नियमात नसून ९० टक्के शेतकºयांची फसवणूक झाली आहे. ती शिल्लक रक्कम व्याजासह मिळावी. यावर्षी ऊस गाळप झाल्यापासून १४ दिवसांत शेतकºयांना मिळाले नाहीत. ते एफआरपीप्रमाणे एकरकमी १५ टक्के व्याजासह देण्यात यावे. या मागण्यांबाबत नुकतीच पुणे साखर संकुलन येथे जिल्हाधिकारी व साखर आयुक्तांशी शिवसेना व शेतकरी संघटना यांची चर्चा झाली. त्यावेळी साखर आयुक्तांनी साखर कारखानदारांवर कारवाई करण्याचे अधिकार आम्हाला नाहीत, असे सांगितले होते. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता.