शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

प्रदेश युवक काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी कराडचे शिवराज मोरे 

By प्रमोद सुकरे | Updated: January 27, 2025 11:51 IST

कराड : महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या संघटनात्मक पातळीवर महत्वाचे फेरबदल करण्यात आले आहेत. त्यात कराड येथील शिवराज मोरे यांची ...

कराड : महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या संघटनात्मक पातळीवर महत्वाचे फेरबदल करण्यात आले आहेत. त्यात कराड येथील शिवराज मोरे यांची शनिवारी प्रदेश युवक काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 

युवक काँग्रेस मधील संघटनात्मक पातळीवरील हे फेरबदल युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चीब यांच्या सूचनेनुसार करण्यात आले आहेत. शिवराज मोरे यांना नुकतेच दिल्ली येथे युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चीब यांच्या तसेच राष्ट्रीय प्रभारी कृष्णा अलवेरू यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. यावेळी प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत उपस्थित होते. 

शिवराज मोरे यांनी याआधी विद्यार्थी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाची दोनदा जबाबदारी सांभाळली आहे. युवक काँग्रेसचे सरचिटणीस व उपाध्यक्ष पदाची निवडणुकीच्या माध्यमातून नियुक्ती सुद्धा झाली होती. प्रदेश युवक काँग्रेसच्या दोन वर्षांपूर्वी पार पडलेल्या निवडणुकीत शिवराज मोरे यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. 

एका सामान्य कुटुंबातील शिवराज मोरे यांनी आपल्या संघटनेच्या जोरावर राज्यभर आपले युवकांचे संघटन वाढवले आहे. या नियुक्तीमुळे राज्यभरातून युवक काँग्रेसच्या सामान्य कार्यकर्त्यांना ताकद मिळणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.

काँग्रेस पक्षाने पुन्हा एकदा माझ्यावर मोठा विश्वास टाकला आहे. चांगले काम करण्याची संधी दिली आहे. त्या विश्वासाला पात्र राहून मी पुढील काळात वाटचाल करणार आहे. काँग्रेसला चांगले दिवस आणण्यासाठी माझे प्रयत्न राहतील. त्यासाठी युवक संघटना अधिकाधिक बळकट करण्यावर भर देऊ.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरcongressकाँग्रेस