शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

शिवेंद्रसिंहराजे-शशिकांत शिंदेंमध्ये सत्ता संघर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 09:56 IST

आता शिवेंद्रसिंहराजे भोसले हे भाजपमध्ये तर दीपक पवार आणि शशिकांत शिंदे हे दोघे राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये असे चित्र आहे. तिन्ही नेत्यांचे तालुक्यात वेगवेगळे गट आहेत. परंपरागत राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेला हा मतदारसंघ गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रवादीकडे राहिला नसल्याने आता पोटनिवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी ताकद लावणार, हे स्पष्ट आहे.

ठळक मुद्देकुडाळ गट : १२ डिसेंबरला मतदान; जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

सागर गुजरसातारा : जावळी तालुक्यातील कुडाळ जिल्हा परिषद गटाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक विभागाने मंगळवारी जाहीर केला. या निवडणुकीसाठी १२ डिसेंबर रोजी मतदान घेतले जाणार आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व माजी आमदार शशिकांत शिंदे यांच्यातील सत्तासंघर्ष उफाळून येणार आहे.

कुडाळ गटाचे तत्कालीन सदस्य दीपक पवार यांनी विधानसभा निवडणूक लढण्याआधी आपल्या जिल्हा परिषद सदस्यपदाचा राजीनामा दिला होता. तो मंजूरही झाला. त्यानंतर पवारांनी राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये प्रवेश करून विधानसभेची निवडणूक लढवली होती.

दरम्यान, पवार हे या ठिकाणी सलग दोनवेळा निवडून आले होेते. जावळी विकास आघाडीच्या माध्यमातून एकदा आणि त्यानंतर भारतीय जनता पार्टीतून दुसºयांदा उमेदवारी करत सलग दोनवेळा त्यांनी या मतदारसंघात विजय मिळवला होता. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि माजी आमदार शशिकांत शिंदे यांची एकत्रित ताकद होती, तेव्हाही पवार विजयी झाले होते. मागील निवडणुकीत दीपक पवार यांनी शशिकांत शिंदे यांचे बंधू ऋषिकांत शिंदे यांचा पराभव केला होता.आता शिवेंद्रसिंहराजे भोसले हे भाजपमध्ये तर दीपक पवार आणि शशिकांत शिंदे हे दोघे राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये असे चित्र आहे. तिन्ही नेत्यांचे तालुक्यात वेगवेगळे गट आहेत. परंपरागत राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेला हा मतदारसंघ गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रवादीकडे राहिला नसल्याने आता पोटनिवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी ताकद लावणार, हे स्पष्ट आहे. आता विधानसभा निवडणूक लढलेले दीपक पवार हे पुन्हा जिल्हा परिषद निवडणूक लढणार का? हेही पाहण्याजोगे ठरणार आहे. पवार यांनी नकार दिल्यास या ठिकाणी शशिकांत शिंदे यांचे बंधू ऋषिकांत शिंदे हे राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार असतील. तर भाजपतर्फे दिवंगत आमदार लालसिंगराव शिंदे यांचे नातू सौरभ शिंदे यांना उमेदवारीची संधी दिली जाऊ शकते, अशी चर्चा आहे.

दरम्यान, या निवडणुकीसाठी २२ नोव्हेंबर ते २७ नोव्हेंबर या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करून घेतले जाणार आहेत. अर्जांची छाननी २८ नोव्हेंबरला होणार आहे. वैध उमेदवारांची यादी त्याच दिवशी प्रसिद्ध केली जाईल. ४ डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. १२ डिसेंबर रोजी मतदान होईल. तर १३ डिसेंबर रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे.  संघर्ष कालही होता अन् आजही...!आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि माजी आमदार शशिकांत शिंदे यांच्या गटांमध्ये जावळी तालुक्यात सुप्त सत्तासंघर्ष कायम राहिला आहे. ग्रामपंचायतींच्या निवडणुकांत तो वेळोवेळी पाहायला मिळाला. आता तर दोन्ही नेते वेगवेगळ्या पक्षांत आहेत, त्यामुळे जावळी तालुक्यावर पकड मिळविण्यासाठी दोघांतील संघर्ष स्पष्टपणे पुढे दिसणार आहे.   

कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहे, त्यानंतरच कुडाळ गटाच्या पोटनिवडणुकीबाबत निर्णय घेतला जाईल. मी अजून काही ठरवलेलं नाही.- दीपक पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य कुडाळ

टॅग्स :PoliticsराजकारणSatara areaसातारा परिसरShivendrasinghraja Bhosaleशिवेंद्रसिंहराजे भोसले