शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्ह्याचे पालकत्व कोणाकडे?; शिवेंद्रसिंहराजे भोसले, जयकुमार गोरेंच्या नावाची चर्चा 

By दीपक देशमुख | Updated: November 25, 2024 12:56 IST

दीपक देशमुख सातारा : सातारा जिल्ह्यातील आठही मतदारसंघांत दणदणीत विजय मिळून महायुतीने सातारा जिल्ह्याचा दबदबा राज्यात निर्माण केला आहे. ...

दीपक देशमुखसातारा : सातारा जिल्ह्यातील आठही मतदारसंघांत दणदणीत विजय मिळून महायुतीने सातारा जिल्ह्याचा दबदबा राज्यात निर्माण केला आहे. त्यामध्ये शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उच्चांकी मताधिक्य मिळून मंत्रिपदावर दावेदारी सिद्ध केली आहे. शिवाय जयकुमार गोरे यांच्या नावाचीही चर्चा आहे. याशिवाय शिंदेसेनेचे शंभूराज देसाई यांचीही वर्णी निश्चित मानली जात आहे. त्यामुळे यांच्या पैकी कोणाला संधी मिळणार आणि सातारा जिल्ह्याचे पालकत्व कोणाकडे येणार, याची उत्सुकता लागली आहे.विधानसभा निवडणुकीचा निकाल लागताच सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे निवडून आलेले आठही आमदार मुंबईकडे रवाना झाले आहेत. सत्तास्थापनेनंतर मुख्यमंत्री कोण, हे निश्चित झाल्यानंतर मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागणार याकडे लक्ष लागले आहे. सातारा जिल्ह्यात प्रथमच भाजपाचे चार आमदार निवडून आले आहेत.शिवाय मित्रपक्ष असलेल्या शिंदेसेनेचे दोन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आमदार निवडून आले आहेत. यावेळी जिल्ह्यातून कऱ्हाड उत्तरमधून मनोज घोरपडे, दक्षिणमधून अतुल भोसले हे भाजपाचे तर फलटणमधून राष्ट्रवादीचे सचिन पाटील हे पहिल्यांदाच विधानसभेत निवडून जात आहेत. तथापि, मंत्रिपदासाठी भाजपातून शिवेंद्रसिंहराजे भोसले, जयकुमार गोरे यांच्या नावाची चर्चा आहे. याशिवाय शिंदेसेनेतून एकनाथ शिंदे यांचे खंदे समर्थक शंभूराज देसाई यांची वर्णी निश्चित मानली जात आहे. सातारा जिल्ह्यात आपली पकड राहण्यासाठी अजित पवार यांच्याकडून मकरंद पाटील पाटील यांचाही विचार केला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जिल्ह्यात दोन लाल दिवे येण्याची शक्यता पाहता पालकमंत्री कोण, याकडे लक्ष लागले आहे.साताऱ्यात शिवेंद्रसिंहराजे सर्वात सीनियरसातारा मतदारसंघातील शिवेंद्रसिंहराजे भोसले २००४ पासून सलग निवडून येत असून, ही त्यांची पाचवी टर्म आहे. स्वच्छ चेहरा, बेरजेचे राजकारण, राज्यातील उच्चांकी मताधिक्य, उदयनराजे भोसले यांच्यासह जिल्ह्यातील आमदारांची अनुकूलता, यामुळे त्यांच्या नावाची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.जिल्ह्यात भाजप वाढवण्यासाठी जयकुमार गोरेंचे प्रयत्नजयकुमार गोरे हेही चौथ्यांदा विधानसभेवर निवडून गेले आहेत. त्यांनी जिल्ह्यात आपल्या मतदारसंघाबाहेर पडून जिल्ह्यात भाजपा वाढवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. फलटणमध्ये रामराजे, कोरेगावात शशिकांत शिंदे, कऱ्हाडला बाळासाहेब पाटील यांनाही त्यांनी प्रसंगी अंगावर घेतले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांच्यामुळे उमेदवारांना ताकद मिळेल. त्यामुळे त्यांच्याही नावाची चर्चा सुरू आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ministerमंत्रीsatara-acसाताराShivendrasinghraja Bhosaleशिवेंद्रसिंहराजे भोसलेJaykumar Goreजयकुमार गोरेBJPभाजपाwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024