शहरं
Join us  
Trending Stories
1
महाकालेश्वरच्या भाविकांचा कन्नड घाटात भीषण अपघात; तिघांचा मृत्यू, चार जणांची मृत्यूशी झुंज!
2
"साहेबांचा आदेश माझ्यासाठी अंतिम..." ५ दिवसांपूर्वी पोस्ट अन् आज मनसेला केला रामराम
3
मुंबईत जन्माचा मुद्दा! CM फडणवीसांचा आवाज वाढला, राज ठाकरेंना म्हणाले, "मला कळत नाही, तुम्हाला कळतं, तर मग..."
4
एकनाथ शिंदेंचा एक फोन, लगोलग कट्टर शिवसैनिकाची घेतली भेट; लालबाग-परळमध्ये रात्री काय घडलं?
5
"कार्यकर्ते तुमचे गुलाम नाहीत"; बाळासाहेबांचं नाव घेत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना बरंच सुनावलं
6
Kishori Pednekar: किशोरी पेडणेकर अडचणीत सापडण्याची शक्यता, भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार, नेमके प्रकरण काय?
7
तेलाचा टँकर जप्त केल्याने तणाव वाढला, जर युद्ध झालं तरं रशियाची ही शस्त्रे अमेरिकेला पडतील भारी
8
ट्रम्प टॅरिफचा फटका! या भारतीय शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचं मोठं नुकसान; ५० टक्यांनी घसरला भाव
9
रितेश देशमुखसोबतच्या वादामुळे सोडला 'राजा शिवाजी' सिनेमा? रवी जाधव म्हणाले- "या सिनेमाची कल्पना माझी होती, पण..."
10
गुंतवणूकदारांची पळापळ! सलग घसरणीने बाजार हादरला; ५ कारणांमुळे बाजारात आली मंदीची लाट
11
सरफराज खानचा मोठा पराक्रम! विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत सेट केला ‘फास्टेस्ट फिफ्टी’चा नवा विक्रम
12
देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली 'मुंबईकर'ची व्याख्या; "बाहेरून आला म्हणून काय झाले..." 
13
मोठी बातमी! तृणमूलच्या आयटी विभागावर ईडीची रेड; ममता बॅनर्जी पोहोचल्या, फाईल्स ताब्यात घेतल्या...
14
१ फेब्रुवारी हीच बजेट सादरीकरणाची तारीख का निवडली? भारतीय अर्थसंकल्पाचा रंजक इतिहास
15
Travel : शाहरुख खानच्या गाण्यांमध्ये दिसणारे स्वित्झर्लंडमधील 'ते' ठिकाण नक्की कुठे आहे? कसे जाल?
16
Chanakya Niti: लोकांमध्ये तुमची किंमत शून्य आहे? चाणक्य नीतीचे 'हे' ५ नियम वापरा, जग तुमचा आदर करेल!
17
Ruturaj Gaikwad Record: टीम इंडियातून डावललेला पुणेकर ऋतुराज गायकवाड ठरला जगात भारी! २० वर्षांपूर्वीचा विश्वविक्रम मोडला
18
५ वर्षांचं प्रेम, लग्नानंतर बायकोला शिकवलं, पोलीस अधिकारी बनवलं; आता नवऱ्यावरच केला आरोप
19
"मराठीत माधुरी दीक्षित नाहीये...", असं का म्हणाले रवी जाधव? आगामी सिनेमाशी आहे कनेक्शन
20
४ राजयोगात २०२६ची पहिली कालाष्टमी: ९ राशींवर महादेव-लक्ष्मी कृपा, चौपट लाभ; कल्याण-मंगल योग!
Daily Top 2Weekly Top 5

99th Marathi Sahitya Sammelan: शिवाजी महाराज यांनी सुरत लुटल्याने समृद्धी - रघुवीर चौधरी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 16:49 IST

बालशिवाजीसाठी चक्क गुजराती भाषेतून पाळणा

हणमंत पाटीलथोरले शाहू महाराज साहित्यनगरी (सातारा) : गुजरातमधील सौराष्ट्राचाही शिवाजी महाराजांशी संबंध आहे. सौराष्ट्रातील एक कवी जव्हेरचंद मेघाणी यांनी बालशिवाजीसाठी चक्क गुजराती भाषेत पाळणा रचला आहे. बालशिवाजीला झोप यावी म्हणून अंगाईगीत गाणाऱ्या जिजाऊ मातोश्रींच्या मुखी हा पाळणा आहे. या अंगाईगीतातून महाराष्ट्राचे सौराष्ट्राशी असलेले संबंध दिसून येतात. गुजरातमधील सुरत दोन वेळा लुटल्याने तिथे विकास व समृद्धी आली. शिवाजी महाराज यांच्याविषयी गुजराती भाषेत बरेच लेखन झाले आहे, असे कौतुकही ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित व ज्येष्ठ साहित्यिक रघुवीर चौधरी यांनी केले.सातारा येथील ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील रविवारी झालेल्या समारोप कार्यक्रमाला रघुवीर चौधरी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. महाराष्ट्रात साहित्य संस्थांच्या पाठीशी राज्य शासन उभे आहे, ही मराठी भाषेसाठी उत्तम गोष्ट आहे. भाषेसाठी साहित्य संस्था, लेखक आणि शासन यांनी असे एकत्रित प्रयत्न करत आहेत, हे चित्र दिलासादायक आहे. भाषेसाठी हे अनुकूल वातावरण आहे. भूमी सुपीक असल्याचे हे लक्षण आहे, अशा अनुकूल वातावरणात भाषेचा विकास होत राहो, अशा शुभेच्छा चौधरी यांनी दिल्या.

वाचा : अण्णाभाऊ साठे यांना ‘भारतरत्न’ देण्यात यावा

अवघे ७ मिनिटांचे भाषण...संमेलनाचे प्रमुख पाहुणे म्हणून रघुवीर चौधरी हे सविस्तर मांडणी करतील, अशी रसिकांना अपेक्षा होती. मात्र, चौधरी यांनी महाराष्ट्रातील नेते दीर्घ भाषणेही उत्तम करतात, अशी टिपणी करीत त्यांनी अवघे सात मिनिटांत भाषण उरकले.

वाचा: मराठी साहित्य संमेलनात भासली उदयनराजे भोसले यांची उणीव!, साहित्य रसिकांनी बोलून दाखवली खंत 

महानायक कादंबरीचे कौतुक..सानेगुरुजी आणि विनोबाजी यांनी तुरुंगवासात गीता प्रवचनांची निर्मिती केली. मीही तेव्हा त्यातून प्रेरणा घेत एक दीर्घ कविता लिहिली होती, अशी आठवण रघुवीर यांनी सांगितली. सातारा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या महानायक कादंबरीचे रघुवीर चौधरी यांनी विशेष कौतुक केले. मी या कादंबरीचा गुजराती अनुवाद वाचला आहे आणि प्रभावित झालो. विश्वास पाटील यांची भेट घेणे, हाही महाराष्ट्रात येण्याचा एक हेतू होता, असे त्यांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Shivaji Maharaj's Surat Loot Brought Prosperity: Raghuvir Chaudhari at Sahitya Sammelan

Web Summary : Raghuvir Chaudhari praised Shivaji Maharaj's impact, noting his connection to Saurashtra and the prosperity brought to Surat. He lauded Maharashtra's support for literary institutions and commended Vishwas Patil's 'Mahanayak' novel, which he read in Gujarati. Chaudhari spoke briefly at the Marathi Sahitya Sammelan.