शिवस्मारकामुळे उंब्रजच्या वैभवात भर पडेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:36 IST2021-03-28T04:36:49+5:302021-03-28T04:36:49+5:30
उंब्रज : ‘येथील मुख्य बाजारपेठेतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात अश्वारूढ पुतळा उभा करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. या शिवस्मारकामुळे ...

शिवस्मारकामुळे उंब्रजच्या वैभवात भर पडेल
उंब्रज : ‘येथील मुख्य बाजारपेठेतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात अश्वारूढ पुतळा उभा करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. या शिवस्मारकामुळे उंब्रजच्या वैभवात भर पडेल,’ असे मत गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी व्यक्त केले.
उंब्रज येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास शासनाची मान्यता मिळाली आहे. यासाठी गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी प्रयत्न केले. त्याबद्दल शिवयोद्धा प्रतिष्ठानच्या वतीने त्यांचा सत्कार लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना येथे करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी शिवयोद्धा प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष बेडके, उपाध्यक्ष शरद जाधव, सचिव महेश जाधव, खजिनदार रणजित कदम, सदस्य सचिन जाधव, रवींद्र वाकडे, मंदार ढवळीकर आदी उपस्थित होते.
मंत्री देसाई म्हणाले, ‘उंब्रजच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करू.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभा करण्यासाठी उंब्रज येथील शिवयोद्धा प्रतिष्ठानच्या वतीने गेली पाच वर्षे पाठपुरावा करण्यात येत होता.’ प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई, ग्रामविकासमंत्री एकनाथ शिंदे, माजी पालकमंत्री विजयबापू शिवतारे यांच्याकडे या बाबतीत प्रस्ताव दिले होते. मात्र, पुरेशी जागा, विविध शासकीय मान्यता मिळविण्यासाठी कार्यकर्त्यांनी केलेल्या प्रयत्नांना यश मिळाले.
२७उंब्रज
उंब्रज येथे अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभा करण्यासाठी शासकीय मान्यता मिळविण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांचा सत्कार शिवयोद्धा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी व उंब्रज ग्रामस्थांनी केला.